• Sun. Jun 28th, 2026
    आमचा आधार हरपला, मयंकच्या आईचा टाहो; डब्यातले 30 प्रवासी काय करत होते? धाकट्या बहिणीचा उद्विग्न सवाल

    Mumbai Local Train Murder : लहान वयात घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन मयंक लोहार अंधेरी येथील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. तो कुटुंबाचा मुख्य कमावता आधार होता.

    मयंक लोहारचे वडील, मयंक, आई, बहीण अनुक्रमे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    वैष्णवी राऊत, वसई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल एका निष्पाप तरुणासाठी मृत्यूचा सापळा ठरेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मुसळधार पावसामुळे डब्यात पाणी येत असल्याने दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय मयंक लोहार याची धावत्या ट्रेनमध्ये चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या निधनामुळे विरारमधील लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ, तसेच संताप व्यक्त केला जात आहे.

    लहान वयात घराची जबाबदारी

    विरारच्या जीवदानी रोडवरील अमरनाथ इमारतीत आईवडील, भाऊ आणि लहान बहिणीसह मयंक राहत होता. लहान वयात घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन तो अंधेरी येथील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. रोजचा कष्टप्रद प्रवास करून घरी परतणारा मयंक कुटुंबाचा मुख्य कमावता आधार होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी परतत असताना, जोगेश्वरी ते मालाड दरम्यान ही घटना घडली. मयंकच्या घरात सध्या सुन्न शांतता आणि अश्रूंचा पूर आहे.
    Maharashtra TimesRakhi Agarwal : माझ्या घरी ड्रिंक चालत नाही, पार्टीलाही पाठवणार नाही; केतनच्या आईने बजावलेलं, सियाच्या 3 गोष्टींमुळे राखी अगरवालना संशय

    वडिलांनी अश्रू दाबले, आईचा टाहो

    अत्यंत कष्टाने मुलाला मोठे करणाऱ्या वडिलांचा धीर आता सुटला आहे. मयंकचे वडील रमेश लोहार यांनी प्रशासनाकडे कठोर न्यायाची मागणी केली आहे. ‘अशी भीषण दुर्घटना इतर कोणाच्याही मुलासोबत घडू नये. माझ्या निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या त्या क्रूर आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी डोळ्यांतील अश्रू दाबत केली. मयंकच्या आईलाही मुलाच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. ‘माझा कमावता मुलगा गेला, आता आमचा आधारच हरपला,’ असे सांगताना त्यांनी फोडलेला टाहो उपस्थितांची काळीज चिरून टाकणारा होता.
    Maharashtra TimesPune Crime : केतनला फरफटत नेऊन दरीत ढकललं? लोहगडाच्या गवतावर संशयास्पद खुणा, चेतन-सियाशी झटापट झाल्याचाही अंदाज

    असंवेदनशीलतेवर बहिणीचे प्रश्नचिन्ह

    लोकलमधील वादातून एका तरुण प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या घटनेने मुंबईच्या लोकल प्रवाशांची माणुसकी आणि असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘माझ्या भावावर लोकलमध्ये चाकूने सपासप वार होत होते, तेव्हा डब्यातील इतर लोक काय करत होते? कोणीही प्रवासी त्याला वाचवायला पुढे का आला नाही?’ असा प्रश्न मयंकच्या लहान बहिणीने संतापाने उपस्थित केला. या घटनेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये लोकलच्या डब्यात जवळपास ३० प्रवासी उपस्थित असल्याचे दिसत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा