Mumbai Local Crime: मंगळवारी मुंबई लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारची हत्या करून आरोपी रोशन सुवर्ण फरार होता. पण तब्बल 15 तासांमध्ये पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
कोण आहे रोशन सुवर्ण?
रोशन सुवर्ण मिरा भाईंदरयेथील रहिवासी असून त्याच्या कुंटुंबियांसोबत राहतो. अंधेरी विमानतळाजवळ कार्गो हँडलिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीमध्ये बार कोड बनवण्याचं काम करत होता. तो त्याच्या वडील आणि भावासोबत या कंपनीमध्ये काम करत होता. लोकलमधून बोरिवलीमध्ये उतरून तो मिरा रोडला गेला आणि तिथून पनवेलपर्यंत पोहोचला. पनवेलमधून पोलिसांनी फरार रोशनला अटक केली.
Mayank Lohar : आमचा आधार हरपला, मयंकच्या आईचा टाहो; डब्यातले 30 प्रवासी काय करत होते? धाकट्या बहिणीचा उद्विग्न सवाल
रोशनच्या चौकशीदरम्यान तो घडाघडा बोलू लागला आणि गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी सायंकाळी काम संपवून त्याने एक अख्खी रमची बाटली संपवली होती. त्यानंतर तो घरी जायला निघाला. अंधेरी पूर्वेतून तो कॅबने घरी जाण्याचा विचार करत होता. पण त्या दिवशी मुंबईमध्ये पाऊस सुरू होता. कोंडीमध्ये अडकून राहील त्यामुळे त्याने लोकलने जाण्याचं ठरवलं. अंधेरी रेल्वे स्थानकात तो चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये प्रथम श्रेणीत चढला. त्यानंतर अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि रोशनमध्ये वाद झाला. तेव्हाच रोशनने चाकू मयंकच्या पोटात भोसकून त्याची हत्या केली आणि बोरिवली स्थानकात उतरून पळ काढली.
रोशनला कसं घेतलं ताब्यात?
प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर थोडीफार गर्दी असल्यामुळे त्याने तिथून पळ काढली. आरोपीची ओळख सुरुवातील पटली नसल्यामुळे शोधमोहीम हाती घेतली. पश्चिम रेल्वेवर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. चर्चगेट ते नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान तब्बल 400 कॅमेरांमधील फुटेज पोलिसांनी पाहिली. लोकलमधून व्हिडीओमुळे त्याचा चेहरा ओळखणं शक्य झालं होतं. त्यानुसार एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तो रेल्वे स्थानकावर दिसून आला. त्या व्हिडीओमध्ये त्याने घातलेल्या शर्टावर त्याच्या कंपनीचा लोगो होता. या लोगोच्या आधारे रोशनची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी कार्गो कपंनीला भेट देऊन त्याची माहिती काढली. मोबाईन नंबर, पत्ता आमि इतर माहितीच्या आधारे त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. मयंकची हत्या करताच तो सर्वप्रथम रिक्षाने मिरा रोडला आपल्या घरी गेला. आंघोळ करून काही कपडे पॅक केले आणि शहर सोडून पळून जाण्याच्या तयारीला लागला. कुटुंबियांना “मी लवकरच; परत येईन” असं सांगून त्याने पनवेलला जाण्यासाठी कॅब बुक केली. तिथून मंगळुरला जाण्यासाठी त्याने बसचं तिकीट बुक केलं होतं. ही बस दुपारी 3 वाजता सुटणार होती. पण तेवढ्यात पोलिसांना तो कुठे आहे हे समजलं होतं.
Mumbai Local Crime: ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय मयांकसाठी प्रवास ठरला शेवटचा; रात्री ११ वाजता फास्ट लोकलमध्ये काय घडलं?
पनवेल रेल्वे स्थानकात रोशन
दुपारी 2 वाजत पोलिसांचं एक पथक पनवेलमध्ये दाखल झालं. तेव्हा रोशन रेल्वे स्थानकात बसलेला त्यांना दिसला. त्याला तिथेच ताब्यात घेऊन बोरिवली जीआरपीमधून आणून अटक केली अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक एम. खुपेकर यांनी दिली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मयंकची जिवंत आहे कि नाही हा प्रश्न रोशनने विचारला अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं सांगितल्यावर त्याने सोशल मीडियावरील बातम्या दाखवल्या. ती वृत्त खोटी असल्याचं सांगत पोलिसांनी त्याला पोलिस स्थानकात नेलं आणि मग खरं कारण सांगत अटक केली.
यापूर्वी रोशनच्या नावानो कोणताही गुन्हा नोंदलेला नाही आहे. हल्ल्यात वापरलेला चाकूही रोशनने त्याच्या मित्राकडून काही दिवसांपूर्वीच खरेदी केला होता. तेव्हापासून तो चाकू रोशनच्या बॅगेतच होता. मंगळवारी पहिल्यांदाच त्याने तो चाकू बाहेर काढला. सध्या पोलिस त्या मित्राची चौकशी करून रोशनला चाकू देण्यामागचं कारण शोधत आहेत.
