Strike Of Rickshaw And Cab Drivers : विविध मागण्यांसाठी मोबाइल ॲपवरून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व कॅबचालकांनी संप पुकारला. प्रवाशांना वेळेवर रिक्षा व कॅब मिळत नव्हती. संघटनांच्या लोकांनी चालकांना दमदाटी केली. ओला, उबर आणि रॅपिडोच्या विरोधात हे आंदोलन होते. विमानतळ, रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांच्या व्यवसायाविरोधात राज्यातील विविध संघटनांकडून आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. यामध्ये राज्यातील रिक्षा, कॅबचालक सामील झाले आहेत. दोन दिवसांपासून पुण्यात मोबाइल ॲपवरून सेवा देणाऱ्या रिक्षा व कॅब यांनी संप पुकारला असला तरी त्याचा काही परिणाम जाणवत नव्हता; पण शुक्रवारी या संपाची तीव्रता वाढली. काही जण स्वखुशीने संपात सहभागी झाले होते.
पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनांना दणका; पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखलतर, या संघटनांकडून विमानतळ, रेल्वे स्थानकावरील कॅबचालकांना बंदमध्ये सामील होण्यासाठी गाड्या बंद ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यंत्रणांचे दुर्लक्ष शहरात शुक्रवारी कॅबचालकांकडून संप सुरू केल्यानंतर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला.
PMP Bus Pune: पीएमपीचे उत्पन्नवाढीचे लक्ष्य; जुलै महिन्यात २५ टक्के प्रवासी संख्यावाढीची ठेकेदारांना सूचनाअनेक प्रवाशांना भर रस्त्यात उतरविण्यात आले; पण पोलिसांकडून त्याबाबत काहीही करण्यात आले नाही. पोलिसांना असा काही संप सुरू आहे याची माहिती नव्हती. ‘आरटीओ’ कडूनदेखील याबाबत काहीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले.
Ajit Pawar: सरकारी कामात अडथळा व रस्ता अडवणाऱ्यांवर 353 दाखल करा; पहाटेपासून अजित पवार पुणे दौऱ्यावर
कॅब अडवून प्रवाशांना धरले वेठीस
बाणेर, विमानतळ, रेल्वे स्थानक परिसरात काही प्रमाणात कॅब सुरू होत्या. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कॅबचालकांकडून सुरू असलेल्या कॅब बंद ठेवण्यासाठी आग्रह धरला जात होता. प्रसंगी कॅबमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांच्याशी वाद घातला जात होता. पिवळ्या पाटीची कॅब दिल्यानंतर त्या अडवल्या जात होत्या. प्रवाशांना अशा प्रकारे वेठीस धरणे चुकीचे आहे, असे मत प्रवाशांकडून मांडण्यात आले. काही ठिकाणी संघटनेच्या कार्यकत्यांकडून थेट प्रवाशांसोबत हुज्जत घातल्याच्या घटना घडल्या.
