• Wed. Sep 9th, 2026

Nashik News: एक चूक दाखवा, मी नाव बदलेन! नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे टीकाकारांना ओपन चॅलेंज

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या रस्ते आणि पायाभूत सुविधा कामांवरून होणाऱ्या टीकेला आयुक्त मनीषा खत्री यांनी सडेतोड उत्तर दिले. सिंहस्थाच्या कामांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. सिंहस्थ कामांच्या निविदाप्रक्रियेबाबत आणि दर्जाबाबत विरोधकांनी पुराव्यासह चूक दाखवून द्यावी. या कामांमध्ये एक जरी चूक काढून दाखवली, तर मी माझे नाव बदलेन, असे खुले आव्हान आयुक्त मनीषा खत्री यांनी टीकाकारांना दिले.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात १२३० कोटी रुपये खर्चून २९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासोबत पाणीपुरवठा, मलनि:स्सारण आणि रस्ते मिळून सुमारे पाच हजार कोटींची कामे सुरू आहेत. परंतु, या कामांच्या दर्जाबाबत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातून टीका सुरू आहे..

Nashik Accident : त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना धक्का लागला, खाली पडताच एसटीच्या खाली आली, तरुणीचा जागीच अंत; लेकीचा अपघात बघून आईला भोवळमहापालिका आयुक्त म्हणून माझे सर्वांना आव्हान आहे. महापालिकेची निविदा कागदपत्रे ऑनलाइन वेबसाइटवर टाकली आहेत. कामांमध्ये पूर्णत: पारदर्शकता ठेवली आहे. ज्यांना तपासायचे आहे, त्यांनी जरूर कामे तपासावीत. त्यांनी चूक काढून दाखवावी. आम्ही कुठे चुकलो आहोत, ते शोधून दाखवावे. त्यानंतर आम्ही योग्य की अयोग्य, हे लोकांच्याच लक्षात येईल, असे खत्री यांनी स्पष्ट केले. सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत आपण कोणतीही तडजोड केलेली नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

सिंहस्थाच्या कामांवर आम्ही कठोरपणे लक्ष ठेवून आहोत. सोशल मीडियावर ‘काय विकास सुरू आहे,’ असा प्रश्न विचारला जातो. माझे सर्वांना पुन्हा एकदा खुले आव्हान आहे, कुंभमेळ्याच्या कामात एक जरी चूक काढून दाखवा, मी माझे नाव बदलेन, असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी होणारी कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra Times‘उलगुलान’ आता मुंबईकडे! मोर्चा काढण्याचा आदिवासी आंदोलकांचा निर्णय, सचिव-आयुक्त हटविण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठामआयआयटी मुंबईकडून कामांचे कौतुक

रस्त्यांच्या कामांसाठी आम्ही एम-४०, एम-६० पर्यंतची सिमेंट स्ट्रेंथ दिलेली आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाने या रस्त्यांच्या कामांची आणि दर्जाची पाहणी केली. एवढ्या चांगल्या दर्जाची कामे आम्ही कुठे पाहिलेली नाहीत, असे आयआयटीच्या पथकाने आम्हाला सांगितले आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे त्या म्हणाल्या.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed