• Tue. Sep 8th, 2026

Purva Patil : ‘महिला कल्याण विभागाची मंत्री झालीस, तर कोणते दोन निर्णय प्राधान्याने घेशील’ या प्रश्नाचे उत्तर देत पूर्वा पाटील हिने ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २०२६च्या ‘महाराष्ट्राची श्रावणक्वीन’चा मान पटकावला. तर ऊर्वी पाध्ये पहिली उपविजेती ठरली, आणि दुसरी उपविजेती ध्रुवी पवार ठरली.

पूर्वा पाटील ठरली महाराष्ट्राची श्रावणक्वीन. तर डावीकडून पहिली उर्वी पाध्ये ठरली प्रथम उपविजेती आणि उजवीकडून पहिली ध्रुवी पवार ठरली द्वितीय उपविजेती. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे लखलखत्या सोहळ्यामध्ये या विजेत्यांच्या नावाची घोषणा होताच श्रावणक्वीनच्या मंचासोबतच प्रेक्षागृहातही विविध भावनांचे इंद्रधनुष्य पाहायला मिळाले.(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : केवळ ९० सेकंदांमध्ये मेंदू काय विचार करणार, कागदावर काय उमटणार, ते परीक्षक-प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचणार हे ‘महाराष्ट्राची श्रावणक्वीन’ सोहळ्याच्या महाअंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाचे ठरते. या ९० सेकंदांत बुद्धिमत्ता, वाक्चातुर्याची कमाल करीत पूर्वा पाटील हिने ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २०२६च्या ‘महाराष्ट्राची श्रावणक्वीन’चा मुकुट पटकावला. पहिली उपविजेती ठरली ऊर्वी पाध्ये आणि दुसरी उपविजेती ठरली ध्रुवी पवार .

काय होता विजय मिळवून देणारा प्रश्न?

वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’, असोसिएट पार्टनर युनियन बँक ऑफ इंडिया, झी मराठी, पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (म.), एसव्हीकेएम, रिजन्सी निर्माण लि., न्यूट्रिया, लालजी गोधू अँड कंपनी, वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ट्रेड लँड्स, स्टायलिंग पार्टनर नावीन्याज् पैठणी स्टुडिओ, कल्चरल पार्टनर महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या सोहळ्यामध्ये ‘महिला कल्याण विभागाची मंत्री झालीस, तर कोणते दोन निर्णय प्राधान्याने घेशील’ या प्रश्नाचे उत्तर देत ऊर्वी पाध्ये, पूर्वा पाटील, किंजल कणस, ध्रुवी पवार आणि श्रावस्ती राहुल या पाच जणींपैकी पूर्वा, ऊर्वी आणि ध्रुवी या तीन सौंदर्यवतींनी विजेतेपद पटकावले.

माजी सौंदर्यवतींची गणेशवंदना

माजी श्रावणक्वीन स्पर्धा विजेत्या सौंदर्यवतींनी गणेशवंदनेने स्पर्धेची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर नृत्य दिग्दर्शक लक्ष्य शर्मा यांनी स्पर्धेचा आलेख अधिक उंचावला. त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावले. कथक सादरीकरण करीत त्यांनी यंदाच्या स्पर्धकांना मंचावर आणले. पैठणीला आधुनिकतेची झालर मिळालेले घागरा परिधान करून या १२ स्पर्धक मंचावर आल्या आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेच्या माध्यमातून जपली गेलेली परंपरा या निमित्ताने अधोरेखित झाली. या परंपरेला दिलेला आधुनिक साज पैठणीच्या इव्हिनिंग गाउनच्या माध्यमातून पाश्चात्त्य पोशाखांच्या फेरीत समोर आला.

दिग्गज परीक्षक मंडळी

या स्पर्धेचे परीक्षक मराठी मनोरंजनसृष्टीतील, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज करतात. यंदा राष्ट्रीय पुरस्कारविजेते प्रतिभावंत छायाचित्रकार आणि दिग्दर्शक महेश लिमये; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जाहिराततज्ज्ञ राज कांबळे; सहज, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री मेधा मांजरेकर; मनोरंजनविश्वात अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे; तसेच गुणी अभिनेता क्षितिश दाते या पाच परीक्षकांनी परीक्षण केले.

Maharashtra TimesNepal Flood : आशा बाळगणंही भ्रामक ठरतंय; आई-बाबा नेपाळ पुरात बेपत्ता, लेकीने ब्लड सँपल पाठवले; म्हणते, ते बॉडींशी मॅच व्हायला नकोतही स्पर्धा केवळ सौंदर्य स्पर्धा नाही तर इथे बुद्धिमत्तेचाही कस लागतो, असे स्पष्ट करत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ स्पर्धेची पार्श्वभूमी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर यांनी उपस्थितांसमोर उलगडली. एक ते दीड हजार प्राथमिक स्पर्धकांमधून महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या १२ स्पर्धकांच्या प्रवासाबद्दलही त्यांनी सांगितले. ‘या माध्यमातून मराठी चित्रपट, नाट्य आणि वेबसीरिजला सुमारे ५० हून अधिक मराठी तारका या १८ वर्षांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत’, असे या स्पर्धेचे व्यावहारिक यशही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांच्या मार्गदर्शनाखील नृत्य सादरीकरण करण्यात आले.भारतीय पारंपरिक वेशभूषेत रॅम्पवॉक करत असताना श्रावणक्वीनचा मंच परंपरा आणि आधुनिकतेची किती यशस्वीपणे सांगड घालतो, हे या सौंदर्यवतींनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर रंगलेली प्रश्नोत्तर, कला सादरीकरणाची फेरी, पाश्चिमात्य पेहरावामधील सहजसुंदर वावर यामुळे या सौंदर्यवती नव्या जगामध्ये पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाल्याचे उपस्थितांना जाणवले. गेल्या सात दिवसांच्या ग्रूमिंगमुळे या स्पर्धकांचा वाढलेला आत्मविश्वास त्यांच्या पालकांनाही जाणवला. या स्पर्धेमध्ये विविध किताबांनी या सौंदर्यवतींचा सन्मान करण्यात येतो. हा किताब स्वीकारतानाचा आनंद सौंदर्यवतींसोबतच त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरही झळकत होता.

Maharashtra TimesAuraiya News : आईच्या पार्थिवाला सात मुलींचा आळीपाळीने खांदा, धाकटीकडून मुखाग्नी, अंत्यविधीवेळी सामाजिक रुढींना सप्तकन्यांची मूठमाती

मान्यवरांची उपस्थिती

अभिनेत्री पूजा सावंत, विजया बाबर, शिवानी सोनार, गौरी नलावडे, राधा सोनार, राधिका हर्षे, कुंजिका काळविंट, प्राची पिसाट, भाग्यश्री मिलिंद, अक्षया नाईक, अभिनेता कुशल बद्रिके, स्वराज नागरगोजे, दिग्दर्शक विजू माने, दिग्दर्शक सुबोध खानोलकर आदी उपस्थित होते.