Manoj Tiwari on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मीरा भाईंदर येथील सभेत केलेल्या आरोपांवर भाजप नेते मनोज तिवारी यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचे मराठी प्रेम केवळ निवडणुकीपुरतेच असते, असा आरोप तिवारी यांनी केला. तसेच राज ठाकरे राजकारणाच्या कचराकुंडीत गेले आहेत, अशी खोचक टीका देखील मनोज तिवारी यांनी केली. त्यांच्या टीकेवर आता मनसेकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“राज ठाकरेंच्या प्रवृत्तीला समजा. राज ठाकरेंचा हिंदी विरोध आणि मराठी प्रेम हे सगळं सिझनल आहे. जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे लोकं असं करतात. राज ठाकरेंना महाराष्ट्राची जनताच शिक्षा देते. राज ठाकरेंचा मनसे पक्ष किती वर्षांपासून आहे? त्यांनी सुरुवातीला अशा चांगल्या गोष्टी सांगितल्या की, त्यांचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर या लोकांनी एकदा उत्तर भारतीयांवर आणि हिंदी भाषिकांवर हल्ला करणं सुरु केलं”, असं मनोज तिवारी म्हणाले.
“माझ्या घरावर सुद्धा हल्ला झाला होता. तेव्हा आम्ही रस्त्यावर आलो होतो आणि आम्ही सांगितलं होतं की, महाराष्ट्राची जनताच, मराठी माणूसच राज ठाकरे सारख्या प्रवृत्तीला शिक्षा देईल. त्यामुळे 13 आमदारांवरुन एका आमदारावर आले. ते सुद्धा भाजपात गेले. राज ठाकरे या देशाची आणि महाराष्ट्राची प्रांतीय रचना, भाषिक एकात्मकता, एकात्मतेला तोडणारा प्राणी आहे”, अशी टीका मनोज तिवारी यांनी केली.
“त्यामुळे राज ठाकरेंना ज्यांना जे बोलायचं ते बोलावं पण एक लक्षात घ्यावं, ही व्यक्ती राजकारण्याच्या कचराकुंडीत गेली आहे तिला जिवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये, अशी मी प्रार्थना करते. राज ठाकरेंना महाराष्ट्र ाची जनता कुठेच बसवत नाही. जो राज ठाकरे यांच्यासोबत जाणार तो सुद्धा समाप्त होणार. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन, मराठी भाषा, तिच्या अस्मितेचं भारतीय जनता पक्ष जेवढं पालन करतो तेवढं कुणीही मराठी संस्कृतीचं पालन करु शकत नाही. राज ठाकरे सारखी लोकं मराठी संस्तृतीचा अनादर करत आहेत”, असा घणाघात मनोज तिवारी यांनी केला.

