Maratha Reservation: मराठा आरक्षणावर राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांसाठी योजनांची घोषणा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकार ४ महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयांद्वारे मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, वसतिगृह भत्ता, परदेश शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी देणारा मोठा दिलासा देण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा शासन आदेश जारी केला जाईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली आहे.