Mumbai Bomb Threat : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन करून खळबळ उडवून दिली. त्याने स्वतःला दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा सदस्य असल्याचे सांगून मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. यानंतर यंत्रणा अलर्ट आली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित असलयाचे सांगून फोन
धमकीचा फोन आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि स्थानिक पोलिसांसह, बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली. याबद्दलची चाैकशी करण्यात आली. पोलिसांनीही तपास केला मात्र, कुठेही संशयास्पद काहीच आढळले नाही. या धमकीच्या फोननंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचे लोकेशन पोलिसांनी लगेचच शोधून काढले. मुंबई गुन्हे शाखेने बोरिवली येथून फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले.Maharashtra Politics : शिंदे-राज भेट, दबावाचं राजकारण की नव्या समीकरणाची नांदी?संपूर्ण मुंबई बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी
मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला हा फोन मंगळवारी २:३० च्या सुमारास आला होता. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव सूरज जाधव असे आहे, तो बोरिवलीचा रहिवासी आहे. पोलिसांना आढळले की, यापूर्वी देखील आरोपीने अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन केला होता. आता पोलिसांकडून आरोपीची चाैकशी केली जात आहे. मागच्या धमकीच्या प्रमाणात देखील आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
फोन येताच यंत्रणात अलर्ट एकाला केली अटक
मागील काही दिवसांपासून सातत्याने असे धमकीचे फोन येताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. विमान कंपन्यांना देखील असे धमकीचे फोन येताना दिसले. यामुळे विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आरोपीने फोन करून म्हटले होते की, “मी डी (दाऊद) टोळीचा आहे आणि मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत..आणि यानंतर अचानक फोन कट करण्यात आला.