• Thu. Mar 19th, 2026
    Nagpur News : खेळताना अचानक तोल गेला, सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून सहा वर्षीय लेकराचा करुण अंत

    Nagpur News : राज्यात दिवसेंदिवस वाईट घटना घडत असतात. अशातच नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षीय लेकराचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.

    सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शारदा नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, सांडपाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतापही व्यक्त होत आहे. मृत बालकाचे नाव दानिश अयाज अन्सारी (वय 6 वर्ष) असं आहे.

    नेमकी घटना काय?

    दानिश घराजवळील मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेला होता. परिसरात सांडपाण्याने भरलेले खोल व उघडे खड्डे असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. खेळताना दानिशचा तोल जाऊन तो थेट या खड्ड्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खड्ड्यात साचलेले घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी नाका-तोंडात गेल्याने त्याचा गुदमरून जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना इतकी अचानक घडली की, कोणालाही त्याला वाचवण्याची संधी मिळाली नाही.Maharashtra TimesPune News : आधी मोबाईल फॉरमॅट केला, नंतर आई घरात नसताना टोकाचं पाऊल; पुण्यात AIचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं

    सांडपाण्याच्या खड्ड्यात मृतदेह

    दरम्यान, दानिश बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मिळून परिसरात शोधमोहीम राबवली. सुमारे दोन तासांच्या अथक शोधानंतर मैदानातील सांडपाण्याच्या खड्ड्यात त्याची बॉडीआढळून आला. हा हृदयद्रावक प्रकार पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला, तर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वाठोडा पोलिस करत आहे.

    वारंवार तक्रार करुनही…

    परिसरात अनेक ठिकाणी उघडे सांडपाणी खड्डे, तुटलेली झाकणे आणि असुरक्षित जागा असल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांनी तातडीने सर्व उघडे खड्डे बंद करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आला, खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण नंतर थेट बॉडी आढळली!

    दरम्यान, ही घटना शहरातील सांडपाणी व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये लहान मुलांचा जीव गेले आहे . तरीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. निष्काळजीपणाची ही मोठी किंमत एका चिमुकल्याच्या जीवाने चुकवावी लागल्याने शारदा नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा