Shiv Chhatrapati State Sports Award Winner List: म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारांची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी मंत्रालयात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सकाळी अकरा वाजता राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरविण्यात येणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Hemlata Patil: हेमलता पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; दीड महिन्यांतच मोठा निर्णय का?
२०२३-२४ पुरस्कार्थींची यादी : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार – शकुंतला खटावकर (पुणे). उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक : जिम्नॅस्टिक्स – प्रवीण ढगे (पुणे). कुस्ती – गोविंद पवार (पुणे), शिवशंकर भावले (लातूर). खो-खो – प्रवीण बागल (धाराशिव). दिव्यांग मार्गदर्शक – मानसिंग पाटील (कोल्हापूर, पॅरा जलतरण). थेट पुरस्कार – गणेश देवरुखकर (मुंबई उपनगर). जिजामाता पुरस्कार – रचना धोपेश्वर (पुणे, पॅरा ज्युदो).
खेळाडू (थेट पुरस्कार) – तिरंदाजी – अदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), प्रथमेश जवकार (बुलढाणा), ॲथलेटिक्स – ऐश्वर्या मिश्रा (मुंबई उपनगर). बॅडमिंटन – चिराग शेट्टी (मुंबई उपनगर). क्रिकेट – जेमिमा रॉड्रिग्ज (मुंबई शहर), देविका वैद्य (पुणे), राहुल त्रिपाठी (पुणे), ऋतुराज गायकवाड (पुणे), शिवम दुबे (मुंबई उपनगर), जितेश शर्मा (अमरावती), यशस्वी जयस्वाल (मुंबई शहर). अश्वारोहण – हृदय छेडा (मुंबई उपनगर). हॉकी – वैष्णवी फाळके (सातारा). कबड्डी – अस्लम इनामदार (अहिल्यानगर), आकाश शिंदे (नाशिक). रोइंग – धनंजय पांडे (रायगड). नेमबाजी – किरण जाधव (सातारा). जलतरण वॉटरपोलो – सांजली वानखेडे (अमरावती), उदय उत्तेकर (ठाणे). तिरंदाजी – मंजिरी अलोणे (अमरावती), यशदीप भोगे (अमरावती). ॲथलेटिक्स – यमुना आत्माराम (पुणे), किरण भोसले (कोल्हापूर). बॅडमिंटन – अक्षया वारंग (मुंबई शहर). बॉक्सिंग – अजय पेंडोर (नांदेड). तलवारबाजी – श्रुती जोशी (नागपूर), धनंजय जाधव (सांगली). कॅनोइंग व कयाकिंग – अंकुश पोवटे (सांगली). सायकलिंग – ऋतिका गायकवाड (नाशिक), मयूर पवार (सातारा). जिम्नॅस्टिक्स (आर्टिस्टिक्स) – ईशिता रेवाळे (मुंबई उपनगर). रिदमिक जिम्नॅस्टिक्स – संयुक्ता काळे (ठाणे). जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन – राही पाखले (ठाणे), आदर्श भोईर (ठाणे). ज्युदो – श्रद्धा चोपडे (छत्रपती संभाजीनगर). Sanjay Raut: ‘तो’ आका मंत्रिमंडळात! सिंधुदुर्ग हत्याकांडप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा आरोप
रग्बी – कल्याणी पाटील (कोल्हापूर), पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर). रोइंग – मृण्मयी साळगावकर (नाशिक), विपूल घुरडे (अमरावती). स्पोर्ट्स क्लायम्बिंग – सानिया शेख (पुणे). स्क्वॉश – राहुल बैठा (ठाणे). टेबल टेनिस – स्वस्तिका घोष (ठाणे). ट्रायथलॉन – मानसी मोहिते (रायगड). वेटलिफ्टिंग – दिपाली गुरसाळे (सांगली), अभिषेक निपाणी (कोल्हापूर). कुस्ती – सृष्टी भोसले (कोल्हापूर), तुषार डुबे (पुणे), स्केटिंग – स्नेहा तायशेटे (मुंबई), जिनेश नानल (पुणे). वुशू – तृप्ती चांदवडकर (पुणे), ऋषिकेश मालोरे (रायगड). सॉफ्टबॉल – ऐश्वर्या पुरी (कोल्हापूर), प्रितीश पाटील (जळगाव). बेसबॉल – रेखा धनगर (जळगाव), प्रदीप पाटील (मुंबई शहर). कबड्डी – पूजा यादव (मुंबई शहर), शंकर गदाई (अहिल्यानगर). खो-खो – गौरी शिंदे (धाराशिव), ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर). मल्लखांब – शुभंकर खवले (मुंबई उपनगर). आट्यापाट्या – शिल्पा डोंगरे (धाराशिव). योगासन – छकुली सेलोकर (नागपूर), वैभव श्रीरामे (नागपूर). कॅरम – आकांक्षा कदम (रत्नागिरी), योगेश धोंगडे (नागपूर).पाण्यासाठी उपसरपंचाला तीन तास कार्यालयात कोंडले; यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचा संताप
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार : जमीन – कृष्णा ढोकले (पुणे), जल – तन्वी देवरे-चव्हाण (नाशिक).
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) : ॲथलेटिक्स – मंगला अडम्बर (नागपूर). पॅरा ॲथलेटिक्स – सचिन खिलारी (सांगली, थेट पुरस्कार), दिलीप गावित (नाशिक, थेट पुरस्कार), संगमेश्वर बिराजदार (धाराशिव). बुद्धिबळ (अंध) – संस्कृती मोरे (सातारा-थेट पुरस्कार), आर्यन जोशी (ठाणे, थेट पुरस्कार). पॅरा ज्युदो – साक्षी बनसोडे (पुणे, थेट पुरस्कार), वैष्णवी मोरे (पुणे, थेट पुरस्कार). पॅरा-नेमबाजी – संतोष गाढे (पुणे, थेट पुरस्कार). पॅरा सायकलिंग – ज्योती गडेरिया (भंडारा). बॅडमिंटन – प्रेमकुमार आळे (पुणे).
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०१९-२०) – जलतरण-डायव्हिंग – आदित्य गिराम. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०२१-२२) – जिम्नॅस्टिक (आर्टिस्टिक्स) – वैदेही देऊळकर.