• Wed. Sep 9th, 2026

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 18, 2026
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन – महासंवाद

पुणे, दि.१८: स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. तसेच श्री क्षेत्र तुळापूर येथील बलिदानस्थळी जावून अभिवादन केले.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक सरपंच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या. तुळापूर येथील संगमस्थळी जावून संगमेश्वराचे दर्शन घेतले.

मौजे तुळापुर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ, तुळापूर स्मारक आणि मौजे वढु (बु.) येथील समाधी स्थळाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विविध विकासकामांबाबत माहिती घेवून ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या श्रीमती पवार यांनी सूचना दिल्या.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश – महासंवाद
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed