Ravi Pujari in Thane Police Custody : कुख्यात गुंड रवी पुजारीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दुपारी न्यायालयात हजर करणार
ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका जुन्या खंडणीच्या प्रकरणात चौकशीसाठी पुजारी याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी करीत आहे. पुजारी याला आज बुधवारी दुपारी २ नंतर न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रवी पुजारी याच्याविरुद्ध २० पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत.
Crime News : एक बायको सोडून गेली, दुसरी गरोदर; बालिकेवर पाच वर्ष अत्याचार, विकृत कीर्तनकारावर गावकरी संतापले, फोटोला जोडे
रवी पुजारीची पार्श्वभूमी
सन १९८९ मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारा गँगस्टर रवी पुजारी याने १९९५ मध्ये भारतातून परदेशात पळ काढला. परदेशातूनच आपल्या हस्तकामार्फत गुन्हेगारी कारवाया करत होता. तसेच हस्तकच पुजारीला माहिती पुरवत असत. या माहितीच्या आधारे पुजारी बांधकाम व्यवसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता. अधूनमधून राजकारण्यांना टार्गेट करणारा पुजारी याने काही वर्षापूर्वी ठाण्यातील एक नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी दिली होती. ठाणे पोलिसांनी पुजारीच्या अनेक हस्तकांना अटक केली आहे.
काही वर्षापूर्वी ठाणे खंडणी विरोधी पथकाने पुजारीच्या दिल्लीतील दोन बहिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनतर काही दिवस खंडणीसत्र थांबल्याचे चित्र होते. २०१६ मध्ये रवी पुजारीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही काढण्यात आली होती. पुजारीविरुद्ध मुंबई, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल आहेत. सन २०१९ मध्ये पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक झाल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले होते.
Nagpur News : खेळताना अचानक तोल गेला, सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून सहा वर्षीय लेकराचा करुण अंत
बड्या नेत्यांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला अटक
बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणविणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्योतिष व्यवसायातून त्याने अनेकांना गंडा घातल्याचा आरोप असून, त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले आहेत. गुन्हे शाखेने खरातला अटक केली असून, या प्रकाराने हायप्रोफाइल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
