उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१५ एप्रिल) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी ही भेट झालीय. शिंदेंसोबत त्यांचे विश्वासू नेते मंत्री उदय सामंत हे देखील शिवतीर्थावर आले होते. तसेच यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, अमेय खोपकर, अभिजीत पानसे आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हेदेखील उपस्थित होते. राज ठाकरेंकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं, यानिमित्ताने ही भेट झाली असल्याचं सांगण्यात येतंय.