Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये राजू भालेराव याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या दोन्ही पत्नींना बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, पीडित महिलांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजू भालेरावला ताब्यात घेतले आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली दोन्ही पत्नींना मारहाण
या प्रकरणी २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली. चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडगाव बुद्रुक येथे पीडित विवाहिता पती राजू भालेराव, तिचा चार वर्षांचा मुलगा, दीड वर्षांची मुली यांच्यासह तिची सवत आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीसह सासूसोबत एकत्रित राहते. १२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान तक्रारदार महिलेच्या सवतीला राजू याने चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. तो पत्नीला इतकी जास्त मारहाण करत होता की, पहिल्या पत्नीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत केली धक्काबुक्की, तरुणीची काढली छेड, छत्रपती संभाजीनगर येथील प्रकारमारहाणीमुळे घाबरलेल्या दोन्ही पत्नींनी घरातून पळ काढत चुलत्याच्या घरी काढली रात्र
त्यावेळी पहिल्या पत्नीला देखील त्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. दोघींनाही त्याने बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान मारहाणीची घटना घडली. या मारहाणीमुळे घाबरलेल्या दोन्ही पत्नींनी घरातून पळ काढत चुलत्याकडे रात्र काढली. मात्र, पतीची दहशत त्यांच्या मनात बसली होती. सकाळ होताच दोघींनीही थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
तक्रारीनंतर पोलिसांनी घेतले राजू भालेराव याला ताब्यात
या माहितीवरून चिकलठाणा पोलिसांनी राजू भालेराव याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपी पती राजू भालेराव याची चाैकशी ही पोलिसांकडून केली जात आहे. राजू भालेराव हा दुसऱ्या पत्नीला चरित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. तिला सोडवण्यासाठी पहिली पत्नी आली आणि तिला देखील त्याने मारहाण केले. या मारहाणीत दोघींनाही जास्त मार लागल्याची देखील माहिती मिळतंय.