निधीवाटपातील भेदभावामुळं शिवसेना महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे.नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांची भेट घेतली.निधीवाटपातील भेदभाव हेच या भेटीमागचं कारण होतं, अशी चर्चा रंगलीय.भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर भाष्य करत हे आरोप फेटाळले आहेत.