• Mon. Mar 16th, 2026
    Sindhudurg Crime : आईचा मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार, 22 वर्षीय आर्यनचं टोकाचं पाऊल; वाढदिवशीच लेकरू माऊलीला सोडून गेलं!

    Sindhudurg Youth Ends Life on Birthday : सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग : अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्गमध्ये घडली आहे. 22 वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आपलं आयुष्य संपवल्याची मोठी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात घडली आहे. आर्यन सुभाष रवंदे (वय 22) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

    आत्महत्या का केली?

    महागडा नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. ही घटना गुरुवारी 5 मार्च रोजी रात्री 11.20 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात तरुण-तरुणीचा नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढत हाताचा चावा; दोघांची पोलिसांना धमकी

    पोलिसांनी काय माहिती दिली?

    आर्यन हा आईसमवेत जामसंडे सहकारनगर येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत होता. त्याची आई मोलमजुरीची काम करते. तर आर्यनही वेल्डींगच्या कामासह इतर मोलमजुरीची कामे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आईला आर्थिक हातभार लावत असे. आर्यनचा 5 मार्च गुरुवारी रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त महागडा नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने आपल्या आईकडे पैशांची मागणी केली. परंतु आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याने राहत्या घराच्या हॉलमध्ये स्वतःला गळफास लावून घेतला. लक्षात येताच त्याच्या आईने नजीकच्या ग्रामस्थांच्या मदतीने आर्यनला जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
    Maharashtra TimesT20 WC Ticket Fraud: क्रिकेट पंढरीत तिकिटांचा ‘खेळ’! सोशल मीडियावरुन आर्थिक लुबाडणूक, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्रीया घटनेचा पंचनामा देवगड पोलिसांकडून करण्यात आला आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आर्यनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मूळ इचलकरंजी गावात त्याच्या पार्थिवावर अंत्यससंस्कार करण्यात आले. आपला घरातला कर्ता लेक गेल्यानं आईने एकच आक्रोश केला. दरम्यान, या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा