• Tue. Apr 22nd, 2025 1:56:01 PM

    अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचे ट्विट, ‘भाजपात काय अवस्था,राज्यसभेत…’

    अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचे ट्विट, ‘भाजपात काय अवस्था,राज्यसभेत…’

    Rohit Pawar On Ashok Chavan- अशोक चव्हाण आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांंनी केलेल्या एका विधानाला पवारांनी उत्तर दिले आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड: कर्जत जामखेड मध्ये मी रोहित पवार यांच्या प्रचारासाठी गेलो होतो, तेथील लोकं माझ्या कानात सांगायचे राम शिंदे कामाचा माणूस आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्या दरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. अशोक चव्हाण तूम्ही मोठे आणि आदर्श नेते आहात. तुम्हाला भाजपात का जावं लागलं आणि आपल्यासारख्या मोठया नेत्याचे काय स्थान आहे हे राज्याला माहीत आहे असा चिमटा रोहित पवार यांनी काढला.

    काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
    रविवारी धनगर समाजच्या वतीने कौठा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सभापती राम शिंदे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी सभापती राम शिंदे यांची प्रशंसा केली. कर्जत जामखेड मतदार संघातून राम शिंदे निवडून येतात. अवघड मतदार संघ आहे.त्यावेळेस मी दुसऱ्या पक्षात होतो, तेव्हा रोहित पवार यांनी बोलावले होते. यावेळी काही लोकांनी कानात येऊन सांगितले की खरा माणूस राम शिंदे आहेत, त्यांना सपोर्ट करा. सामान्य माणसे हृदयात ले काय आहे ? सामान्य माणसाच्या भावना काय आहे, जे लोकामध्ये राहतो लोकांची कामे करतो, आवाज उठवतो असा माणूस राम शिंदे आहेत अस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हणाले.

    रोहित पवारांचा पलटवार, चव्हाणाचे उत्तर
    त्यांच्या या वक्तव्यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यवर टीका केली. भाजपमध्ये काय अवस्था आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे, कोणाच्या कानात सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न खऱ्या खोट्याच उत्तर कर्जत जामखेडच्या लोकांनी दोनवेळा दिलं आहे. राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागल नाही असा टोला देखील रोहीत पवार यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.. दरम्यान रोहीत पवार यांच्या ट्विटवर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले. लोकशाहीत विरोधकाची प्रशंसा करु नये अशी अपेक्षा चूकीची आहे . रोहीत पवार दोन वेळा आमदार आहेत याची जाणीव मला आहे. पण राम शिंदे यांचे ही काम आहे अस्तित्व आहे. राम शिंदे नांदेडला आले तेव्हा त्याचा बद्दल मी गौरवउद्गार काढले त्याचं वाईट वाटायच कारण नाही अस अशोक चव्हाण म्हणाले की, रोहित पवार यांचं जितकं वय आहे, तितका माझा अनुभव आहे असं आशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान अशोक चव्हाण यांचं वक्तव्य आणि त्यांनतर रोहित पवार यांनी काढलेला चिमटा चर्चेचा विषय बनला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed