MNS VS Gunaratna Sadavarte : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत असल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना एका मनसे पदाधिकाऱ्याने फोन केला. यावेळी या पदाधिकाऱ्याने सदावर्तेंना मोठा इशारा दिला आहे.
मनसेच्या नाशिक उपाध्यक्षांचा गुणरत्न सदावर्तेंना फोन
मनसेचे नाशिक उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला. राज ठाकरेंवर टीका केल्यास रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी सदावर्तेंना दिला. दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.Tanisha Bhise Case : ‘धमक्यांचे फोन, भीती वाटते, रात्री झोपू शकत नाही’, डॉ. घैसास राजीनाम्यात काय-काय म्हणाले?
फोनवर नेमकं संभाषण काय?
“हॅलो! माजला का? तुला लाज वाटली पाहिजे. नाशिकमध्ये ये. तुला दाखवतो”, असं म्हणत मनोज घोडके यांनी गुणरत्न सदावर्ते यांना शिवीगाळ केल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे. त्यावर सदावर्तेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “असं केल्याने काही होणार नाही. मेरी मर्जी मैं हिंदी बोलू, मराठी बोलू, गुजराती बोलू”, असं सदावर्ते फोनवर प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. मनोज घोडके यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली आहे.
‘तर मनसैनिक तुला सोडणार नाहीत’
“गुणरत्न सदावर्तेंसारखा बिनडोक माणूस, राज ठाकरेंवर बोलायचा प्रयत्न करतो. अरे सूर्यवर थुंकायचा प्रयत्न करु नको. सदावर्ते, नाहीतर तुझं रस्त्यावर चालणं मुश्किल होईल. हे असे चुकीचे कामे केली, चुकीचे वक्तव्य केले तर याचा तुला धडा शिकवण्यात येईल. यानंतर राज ठाकरे यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं तर मनसैनिक तुला सोडणार नाहीत. हे लक्षात ठेव. मराठी तुला बोलावीच लागेल”, असं मनोज घोडके म्हणाले आहेत.