वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच महादेव गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण झाली. याचं प्लॅनिंग तीन दिवसांपासून सुरू होतं. असा दावाही मीरा गिते यांनी केलाय. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं तर सगळं स्पष्ट होईल अशी मागणीही मीरा गिते यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या लाठ्याकाठ्यांनीच मारहाण झाली आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत मीरा गिते यांनी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलंय. वाल्मिकला सोई सुविधा पुरवण्यात अडचणी येत होत्या, म्हणून त्यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवलं. असा दावाही त्यांनी केलाय….