Uday Samant on Shiv Sena MLAs : “सोमवारपासून रविवारपर्यंत आपण जर का मुंबईत ठाण मांडत बसत असू तर आपण सिंधुदुर्गमधील संघटना कधी बांधणार आहोत? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे”, अशा शब्दात उदय सामंत यांनी कोकणातील शिवसेना आमदारांचे कान टोचले.
“शिवसेना पक्ष हा सामान्य माणसापर्यंत तळागाळापर्यंत कसं पोहोचतो याकडे प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजे. विकासाची कामे असतील, जिल्ह्याच्या समिती असतील, विशेष कार्यकारी अधिकारी पद असतील, ही सगळी नावं आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक ही नेते मंडळी एकत्रितपणे बसून चर्चा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवतील. त्यामध्ये कोणी डावे-उजवे होणार नाही”, असं मंत्री तानाजी सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित संवाद बैठकीत उदय सामंत बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, दत्ता सामंत, संजय आग्रे, राजा गावडे, रुपेश पावसकर, आनंद शिरवलकर, संजय पडते, अशोक दळवी, वर्षा कुडाळकर, सचिन वालावलकर, वैशाली पावसकर, गणेश गवस आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.Manikrao Kokate : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे मागितली माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
‘तर आपण सिंधुदुर्गमधील संघटना कधी बांधणार आहोत?’
“सोमवारपासून रविवारपर्यंत आपण जर का मुंबईत ठाण मांडत बसत असू तर आपण सिंधुदुर्गमधील संघटना कधी बांधणार आहोत? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे”, अशा शब्दात सामंत यांनी सुनावलं. “मंगळवार, बुधवार मुंबई जायला कोणाचा आक्षेप नाही. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मंत्री भेटू शकतात”, असेही सामंत यांनी म्हटलं आहे.
“विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडणार नाही याचा शब्द आपण शिंदे साहेबांकडून घेऊ. जिल्हा परिषदेसाठी आपण मुख्यमंत्री आणि गोरे साहेबांकडून शब्द घेऊ. पण हे सगळं करत असताना आपली संघटना दखल घेण्याएवढी संघटना गावागावात असणं गरजेचं आहे. आपण कुठेही कमी पडणार नाही, प्रत्येक बुथवर आपण एकावन्न टक्केपेक्षा जास्त असलो पाहिजेत”, असं उदय सामंत म्हणाले.
‘दिवसाला फक्त दोन तास काम करणार आहोत की नाही?’
यावेळी सामंत यांनी रत्नागिरी येथील मतदारसंघातील पक्ष संघटनेच्या बांधणीची माहिती देत आपण महाराष्ट्रात जरी फिरत असलो तरी शनिवार आणि रविवार मी दोन दिवस मतदारसंघात असतो. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गेल्या तीन दिवसातील कार्यक्रम सांगत ते रोज पहाटे साडेतीन चार वाजता घरी येत असतात, जो नेता आपल्यासाठी वीस-वीस तास काम करतो त्यासाठी आपण दिवसाला फक्त दोन तास काम करणार आहोत की नाही? हा विचार आपण केला पाहिजे, असं उदय सामंत पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.Girish Mahajan : महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप, खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
‘काही लोकांची मक्तेदारी अशी पडलेली असते की…’
“माझे आत्ताच शिंदे साहेबांशी बोलणं झाल आहे. नवे आणि जुने यांचा कॉम्बिनेशन नक्की करू. पण काही जण 15-15, 20 वर्ष एकाच पदावर बसून राहतात. आणि तिथे वहिवाट लावतात, अशी वहिवाट कोणी जर का लावली असेल आणि तो जर का काम करत नसेल तर त्याने स्वतःहून माझ्याकडे पत्र आणून द्यावीत. मला आणि आमच्या नेते मंडळींना निर्णय घ्यायला भाग पाडू”, असा सज्जड दम शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. “काही लोकांची मक्तेदारी अशी पडलेली असते की मी हलवणारच नाही. माझंच ते पद आहे. या पदावर दुसरा कोणी बसू शकत नाही”, असं उदय सामंत म्हणाले.