Nashik Man Dancing on DJ dies : डीजेमध्ये नाचत असतानाच अचानक नितीनच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर तो जागीच कोसळला.
काय घडलं नेमकं?
नितीन फकिरा रणशिंगे असे मयत युवकाचे नाव आहे. नाशिकच्या फुलेनगर परिसरातील काल रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला फुले नगरच्या तीन पुतळ्याजवळ डीजे साऊंड सिस्टीम लावण्यात आले होते.
डीजेमध्ये नाचत असतानाच अचानक नितीनच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर तो जागीच कोसळला. त्याच्या मित्र मंडळींनी त्याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची प्राणज्योत मालवली.Gadchiroli Crime : दरवाजे उघडे, टीव्ही सुरु, अंगावर दागिने तसेच! ६१ वर्षीय निवृत्त महिला अधिकाऱ्याला भरदुपारी संपवलं
मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट
डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजाचा त्रास झाला, त्यामुळे तरुणाच्या नाकातोंडातून रक्त आले अशी चर्चा होती. परंतु त्याला काही वर्षांपासून गंभीर आजार झाल्याचं समो आलं आहे. दरम्यान, नितीन नेमका कुठल्या कारणामुळे मृत्युमुखी पडला, हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होणार आहे.Crime News : डार्लिंग मी आलो! नवरा घरी, पण बायकोच्या मिठीत शेजारी; रंगेहाथ पकडलं अन् गुप्तांगाला चावला
हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू
दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यात हृदयविकाराचा धक्का बसलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. ओमकार सुनील महांगरे (वय २३, रा. गुठाळ, ता. खंडाळा, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकारला सकाळी अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे नातेवाइक त्याला रिक्षातून भोर उपजिल्हा रुग्णालयात घेऊन निघाले होते. भोर-शिरवळ मार्गावरील सीताबाई वस्तीजवळ ओमकार अत्यवस्थ झाला. उपजिल्हा रुग्णालयात आणले असता हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ओमकार दुचाकी दुरुस्ती व डीजेचा व्यवसाय करायचा.