Ratnagiri Two Men Died In Mumbai Local Accident: मुंबईत रेल्वे अपघातात रत्नागिरीच्या दोन तरुणांना हृदयद्रावक अंत झाला आहे. लोकलमधून प्रवास करत असताना लोकलमधून पडून झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
कुर्ल्यात रेल्वे अपघात, छिन्नविछिन्न मृतदेह अन्…
होडखाड-वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता. कामावरुन परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अशक्य बनले होते. अखेर अपघातस्थळी पडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात यश आले. यानंतर तरुणाच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत रात्रीच गाव गाठले. सुशांतचा मृतदेह पाहून पत्नीसह आईने फोडलेल्या हंबरड्याने साऱ्यांचेच डोळे पाणावले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरुणावर नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.Pune Crime: रात्री झोपी गेले ते उठलेच नाहीत, एक क्लू सापडला अन् भयंकर घटनेचा उलगडा, पत्नीनेच.., पुण्यात खळबळ
डोंबिवलीकर तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू
तर कामानिमित्त डोंबिवली हून मुंबईला निघालेल्या एका डोंबिवलीकर तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकलच्या दरवाजात तरुण उभा होता लोकल गर्दीने खचाखच भरलेली असल्याने त्याचा तोल जाऊन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कोपर ते दिवा स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली असून रुपेश गुजर असे मृत तरुणाचे नाव आहे. डोंबिवली येथील तुकारामनगरमधील रुपेश हा कुटुंबासह रहातो. गुरुवारी सकाळी साडे आठ ते नऊ च्या सुमारास त्याने डोंबिवली स्थानकातून मुंबईला जाणारी लोकल पकडली. लोकल गर्दीने भरलेली असल्याने तो दरवाजात लटकलेल्या अवस्थेत उभा होता. लोकलने वेग पकडताच गर्दीच्या रेट्याने त्याचा हात निसटला आणि त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.