डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रणिती शिंदे सोलापुरात आल्या होत्या. यावेळी खासदार प्रणिती शिंदें यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राक्षसाला जसे रक्त पाहिजे, तसे भाजपला दंगली पाहिजे अशी टीका त्यांनी केली. सोलापूरच्या विविध प्रश्नांवर बोलताना त्यांनी आरोग्य खात्यावरही सडकून टीका केली. सरपंच प्रकरणातील व्हिडिओ पाहिल्यानंतरही सरकार हसतंय-खेळतंय असं त्या म्हणाल्या.