• Fri. Apr 25th, 2025 1:54:32 AM

    एकनाथ शिंदेंनी केली फडणवीसांची अमित शहांकडे तक्रार, संजय राऊतांचा मोठा गाैप्यस्फोट

    एकनाथ शिंदेंनी केली फडणवीसांची अमित शहांकडे तक्रार, संजय राऊतांचा मोठा गाैप्यस्फोट

    Sanjay Raut on Eknath Shinde : संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करून एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले. तसेच, शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. यासोबतच मोठा प्रस्ताव शिंदेंकडे शहा यांनी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : नुकताच संजय राऊत यांनी अत्यंत मोठा गाैप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, शहा यांनी एकनाथ शिंदे यांची मागणी फेटाळून लावली आहे. हेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केलीये. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिली नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदेंची शिवसेना भाजपामध्ये विलीन करण्याचा प्रस्थाव अमित शहा दिला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय.

    देशात सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असल्याचे राऊतांनी म्हटले. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिली नसल्याचेही शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे म्हटले. माझे निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फिरवले जातात, असेही एकनाथ शिंदे यांनी शहा यांना म्हटले. आता संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. यावर आता शिवसेनेच नेते बोलताना दिसत आहेत. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय संवाद झाला हे राऊतांना काय माहिती असे त्यांनी म्हटले.
    ‘स्वारगेट’चा मुद्दा गाजणार! सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; मंत्री कोकाटे, मुंडे विरोधकांचे लक्ष्यगेल्या काही दिवसांपासू महायुतीमध्ये वाद वाढताना दिसतोय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय हे रद्द करताना देवेंद्र फडणवीस हे दिसत आहेत. यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. खरोखरच शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन होणार का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात म्हणजे महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, भाजपाने फडणवीसांना मुख्यमंत्रिपद दिले.

    तेव्हापासून शिंदे हे नाराज असल्याचे सांगितले जातंय. अजूनही महायुतीमधील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा हा सुटलेला नाहीये. आता तर थेट एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचीच तक्रार ही अमित शहा यांच्याकडे केलीये, असा दावा आहे. आमचे १३२ आमदार असल्याने आता भाजपाशिवाय दुसरा मुख्यमंत्री होणार नसल्याचे शहा हे एकनाथ शिंदे यांना सांगितले. संजय राऊत हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed