Mumbai Doctor Anuja Kulkarni Dead : कान, नाक, घसा विभागात सेवा देणाऱ्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यामार्फत काही शस्त्रक्रिया नियोजित होत्या. मात्र त्या शस्त्रक्रिया विभागात हजर न झाल्याने खळबळ उडाली
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान, नाक, घसा विभागात सेवा देणाऱ्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यामार्फत बुधवारी काही शस्त्रक्रिया नियोजित होत्या. मात्र त्या शस्त्रक्रिया विभागात हजर न झाल्याने अन्य डॉक्टर, परिचारिकांनी त्यांना मोबाइलवर आणि त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
जमिनीवर पडलेल्या आढळल्या
त्या प्रतिसाद देत नसल्याने एका कर्मचाऱ्याने त्यांचे कार्यालय गाठले. ते आतून बंद होते. त्याने अनेकदा दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने काचेतून डोकावून पाहिले, तेव्हा अनुजा जमिनीवर पडलेल्या दिसल्या.
Pune News : मांजराने पोपटाचा पिंजरा पाडला, पुण्यातील दोन शेजाऱ्यांचा वाद हाणामारीपर्यंत, मांजर मालकावर गुन्हा
मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट
दार फोडून आत गेलेल्या अन्य डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलिस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी अनुजा यांचे पार्थिव ताब्यात घेऊन ते शवविच्छेदन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. तपासणीत संशयास्पद असे काही आढळले नसले, तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
जळगावात तरुणाची रेल्वेखाली उडी
दुसरीकडे, जळगावातील एका तरुणाची खासगी कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली, परंतु तेथे हजर होण्यापूर्वीच तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आयुष्याची अखेर केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास बापू हटकर (वय २६, रा. नित्यानंदनगर) असे या तरुणाचे नाव आहे.
Pune Crime : पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरडीला अत्याचार करुन संपवलं, आईची साथ; आरोपीची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द
विकास हटकर पत्नीसह राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते रात्री घरी उशिरा येत होते. त्यामुळे ते कोणत्या तणावात आहे का, याचीही चिंता कुटुंबीयांना होती. विकास यांची काही दिवसांपूर्वीच जळगावातील एका खासगी कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. तेथे ते काही दिवसांत हजर होणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी रेल्वेखाली जीव दिला.
