सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे या बैठकीला उपस्थित होते.बैठक संपल्यानंतर उत्तम जानकरांनी माध्यमांशी संवाद साधला.मारकडवाडी प्रकरणावर प्रश्नावर बोलताना आमदार जानकर यांनी निवडणूक आयोगालाच चॅलेेंज दिलं आहे.एकाचवेळी ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, फरक समजेल…असं उत्तम जानकर म्हणाले.