• Wed. Sep 16th, 2026

Nashik Crime News : नाशिकमध्ये काल एक धक्कादायक तथा संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पोटच्या गोळ्यानेच आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईची हत्या केलीय.

नाशिक हनुमान नगर मुलाने आईची हत्या केली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नशेच्या धुंदीत पत्नीशी किरकोळ कारणावरून भांडण करणाऱ्या मुलाने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वृद्ध आईच्या डोक्यात टणक वस्तूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणात पिठलं न बनवल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाल्याची माहिती आहे. हनुमान नगरात घडलेल्या खुनाच्या घटनेत संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोतीवाला कॉलेजच्या मागील हनुमान नगर परिसरात मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कमलाबाई आणाजी वळवी (वय ८०, रा. हनुमान नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित मुलगा तानाजी आणाजी वळवी याला ताब्यात घेतले आहे. संशयित तानाजी याला दारूचे व्यसन असल्याची माहिती आहे. घटनेच्या रात्री ‘जेवणात पिठलं का बनवले नाही’, या कारणावरून त्याचा पत्नीशी वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर ८० वर्षीय वृद्ध आई कमलाबाई यांनी दोघांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेच्या धुंदीत असलेल्या तानाजीने आईवरच राग काढत कोणत्यातरी टणक वस्तूने त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केले.

Maharashtra TimesMaharashtra Weather : वरुणराजा रुसला! पावसाळा संपण्यासाठी अवघे दोन आठवडे, मेघराजा बरसण्याची शक्यता नाहीच, IMDचा नवीन अंदाज; कुठे काय परिस्थिती?

डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव

या हल्ल्यातकमलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. मात्र, हल्ल्यानंतरही त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत असतानाही तानाजी आणि कुटुंबीयांनी वृद्ध कमलाबाई यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. कमलाबाई यांची नात सोनाली गजानन डंबाळे आणि नातू दीपक भगवान गावीत यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

पाइपला धडकून नाशिकमध्ये तरुणाचा करुण अंत

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान सुरक्षेच्या उपायांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. कृषिनगरकडून तिबेटीयन मार्केटमार्गे सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडव्या टाकलेल्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात सिद्धार्थ दत्तात्रय गोरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाले.

Maharashtra TimesSunetra Pawar : आपल्या वहिनी आहेत ना… प्लॅन ठरला! सुनेत्रा पवारांचं राजकीय रिलाँचिंग; तटकरे-पटेलांबाबत मात्र संदिग्ध भूमिका
या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व नागरिकांनी मृतदेह थेट महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणून ठेवत तीव्र आंदोलन केले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा