Chhatrapati Sambhajinagar : कुणाचेही फोन आले तरी हातगाड्यांवरील कारवाई थांबवू नका, महापालिका आयुक्तांचे आदेश
शहरातील कोणत्याही रस्त्यांवर हातगाड्यांमुळे अडथळा येत असेल. अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना कुणाचेही फोन आले तर कारवाई थांबवू नका. कुणाचे फोन आले तर त्याची नोंद घ्या. कारवाईला विरोध करणे म्हणजे कायद्याला विरोध करणे आहे, असे कुणी करत असेल तर तक्रार करा, कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.