• Wed. Sep 16th, 2026

मोदींनी मैत्री निभावली, जुन्या सोबत्याची तक्रार येताच सूत्रं हलवली, महाराष्ट्रातील भाजप आमदाराची माघार, शिंदेंच्या डिपार्टमेंटला पत्र

Narendra Modi Schoolmate gets Land back : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या बांधकाम कंपनीने भाईंदरमधील आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाळेतील सोबती असगर वोरा यांनी केला होता. या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात निपटारा झाला आहे

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शाळेत सोबती राहिलेले ८१ वर्षीय असगर अली वोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसातच सूत्रं हलली आणि मेहतांनी माघार घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नरेंद्र मेहतांच्या मालकीच्या बांधकाम कंपनीने भाईंदरमधील आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप वोरा यांनी मोदींकडे केला होता. त्यानंतर, आपण त्या वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत आहोत आणि त्या भूखंडासाठी मिळालेली बांधकामाची परवानगीही परत करत आहेत, असे मंगळवारी मेहता यांनी जाहीर केलं. वोरांविरोधात यापूर्वी दाखल केलेली तक्रारही मागे घेत असल्याचं मेहतांनी सांगितलं आहे.

मित्राची मोदींकडे तक्रार

मीरा रोडचे रहिवासी असलेल्या असगर अली वोरा यांनी गुजरातच्या वडनगरमधील बी. एन. स्कूलमध्ये नरेंद्र मोदींसोबत शिक्षण घेतले होते. त्यांनी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेत या वादात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यांनी सांगितले की, १९८९ मध्ये त्यांनी भाईंदर पूर्व येथील नवघर भागात सुमारे २,८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती; परंतु २०११ मध्ये ‘स्वयम् बिल्डर्स’ आणि मेहता यांच्या ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ने या भूखंडाचा ताबा घेतला. वोरा यांनी सांगितले की, ते गेल्या १५ वर्षांपासून विविध सरकारी यंत्रणांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. भेटीदरम्यान पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Maharashtra TimesSunetra Pawar : आपल्या वहिनी आहेत ना… प्लॅन ठरला! सुनेत्रा पवारांचं राजकीय रिलाँचिंग; तटकरे-पटेलांबाबत मात्र संदिग्ध भूमिकाया भेटीनंतर सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेतली. मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वोरा, मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे उपस्थित होते.

नगररचना विभागाला पत्र

बैठकीदरम्यान, नरेंद्र मेहता यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगररचना विभागाला एक पत्र सादर केले. त्यात त्यांनी नमूद केले की, ते वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत आहेत आणि मिळालेली बांधकामाची परवानगी परत करत आहेत. मेहता यांनी पत्रात म्हटले आहे की, ही जमीन २०१९ मध्ये मर्विन फर्नांडिस यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती.

Maharashtra TimesSeema Pahuja : हाथरस, उन्नाव, आरजी कर अन् गुडिया मर्डर प्रकरण सोडवलंय; दिशा सालियन केस CBI च्या चाणाक्ष एसपी सीमा पाहुजा यांच्या हाती

पोलिस आयुक्तांनाही स्वतंत्र पत्र

पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या एका स्वतंत्र पत्रात मेहतांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्यामुळे ते वोरा यांच्याविरुद्धची आपली पूर्वीची तक्रार मागे घेत आहेत.