• Wed. Sep 16th, 2026

Maharashtra Weather Latest Big Update : पावसाने दडी मारल्याने शहरातील हवामानातही बदल दिसतो आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून, दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. धरणे पूर्ण भरलेली असल्याने पाणीपुरवठ्याची तातडीची चिंता नाही. मात्र, हंगामाच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने घेतलेली विश्रांती शेतकरी आणि प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली आहे. पुढील चार दिवसांतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाही. आकाश अंशत: ढगाळ राहून अधूनमधून हलक्या सरी पडतील, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र वेदर फॉरकास्ट, आजचं हवामान अपेडट, हवामान विभाग पावसाचा बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळा संपण्यासाठी आता अवघे दोन आठवडे शिल्लक असताना, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने उपस्थिती लावली आहे. मुंबईमध्ये दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी अधून मधून विश्रांती घेत पाऊस पडला. मात्र, महामुंबई वगळता राज्यात इतर विभागांमध्ये पावसाचा फारसा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा येथील पावसाची तूट चिंताजनक आहे. आता बंगालच्या उपसागरात २० ते २३ सप्टेंबरदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रणालीमुळे ही तूट किती भरून निघते, याकडे महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष आहे.

पावसाकडून फारशी आशा नाही

राज्यात अजूनही एकूण १६ टक्के तूट कायम आहे. मराठवाडा विभागामध्ये ३६, तर विदर्भ विभागामध्ये २७ टक्के टक्के तूट आहे. बीड, धाराशीव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ही तूट ४० टक्के आणि अधिक आहे. सर्वाधिक ४९ टक्के तूट बीड आणि हिंगोली जिल्ह्यात आहे. पावसाळ्याचा आता शेवटचा टप्पा सुरू झाल्याने उर्वरित काळात होणाऱ्या पावसाकडून फारशी आशा नसल्याचे चित्र आहे.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : ‘मी शेतकऱ्यांच्या पाठीशी’; दुष्काळाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, CM फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनाच्या दीड दिवसाच्या कालावधीत पावसाने अधूनमधून हजेरी लावली. काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे शून्य, तर कुलाबा येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात कुलाबा येथे ३ तर सांताक्रूझ येथे ४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. रविवारचा एक दिवस जोरदार उपस्थिती लावून पाऊस पुन्हा फारसा नसल्याने कमाल तापमान पुन्हा ३२ अंशांहून पुढे गेले आहे.

पाण्याची स्थिती चिंताजनक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस असला तरी इतरत्र पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. ठाणे जिल्ह्यातही सात टक्के तूट असल्याने मुंबईमध्ये पाणीपुरवठ्यावर येणाऱ्या नियंत्रणाच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra TimesManoj Jarange : ‘जरांगे यांची भाषा आक्षेपार्ह’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, मुंबईला येताना कुटुंबासह जनसमुदायाला अश्रू अनावर

पावसाने बळीराजा सुखावला

मंगळवारी दीड दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने मिरवणुका तसेच, विसर्जन घाटावर भक्तांची गर्दी दिसली. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणरायाच्या आगमनासह पावसाच्या सरी कोसळल्याने अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. रविवारी आगमनाच्या दिवशी पालघर जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी बरसत होत्या. सोमवारी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी दुपारपर्यंत पावसाचा जोर होता, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.

पालघर जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसला. रविवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र मूर्ती शाळेत गणरायाला घरी नेण्यासाठी गेलेल्या भक्तांचा जल्लोष तसूभरही कमी झाला नव्हता.

Maharashtra TimesHeavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

विसर्जन घाटावर भाविकांची संख्या लक्षणीय

सोमवारी प्राणप्रतिष्ठेवेळीही पाऊस होता, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. मंगळवार सकाळचा अपवाद वगळता तुरळक सरी कोसळल्या. पावसाने उघडीप दिल्याने दीड दिवसाची विसर्जन मिरवणूक व विसर्जन घाटावर भाविकांची संख्या लक्षणीय होती. प्रशासनाने नागरिकांना पारंपरिक वाद्य आणि आवाजाची मर्यादा न ओलांडता साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला खासगी, सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद देत आगमन, विसर्जनासाठी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले. चिखले, नरपड, घोलवड, बोर्डी यांसह अनेक गावांमध्ये टाळ मृदुंगांच्या सुरावटींवर गणरायाला निरोप देण्यात आला.

आज, बुधवार १६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर ओसरणार असून जिल्ह्यात दिवसभर उघडीप आणि काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील. हे वातावरण २० सप्टेंबरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra TimesDighi Shipbuilding Cluster : देशात सर्वात मोठं शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारणार, 27 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

निम्मा सप्टेंबरही कोरडाच

जुलैमध्ये मुसळधार पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही हीच स्थिती कायम राहिली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत शिवाजीनगर येथे केवळ २१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पुण्यात सन २०१८नंतरचा या कालावधीत पडलेला दुसरा सर्वांत कमी पाऊस ठरला आहे. ४५ दिवसांत एकाही दिवशी दुहेरी आकड्यात पाऊस झालेला नाही.

जुलैतील विक्रमी पावसाचा मोठा वाटा

जुलैतील धडाक्यानंतर शहरात पावसाने घेतलेली विश्रांती आता अनेकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. या वर्षीच्या हंगामात एक जून ते १५ सप्टेंबरदरम्यान पुण्यात ६९३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात जुलैतील विक्रमी पावसाचा मोठा वाटा आहे. जूनमध्ये ६४ मिमी, जुलैमध्ये ५०८ मिमी, ऑगस्टमध्ये ८०.८ मिमी, तर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात २१.८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. एकूण हंगामी आकडे समाधानकारक दिसत असले, तरी दीड महिन्यापासून पावसाची स्थिती चांगली नाही. पोषक घडामोडींअभावी मध्य महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडत नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा