मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील मध्यरात्री दोन वाजता पाटोदा शहरात दाखल झाले. मध्यरात्रीची वेळ असतानाही जरांगेंच्या स्वागतासाठी मराठा बांधवांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. रस्त्यावर फुलांची रास आणि वाहनासमोर भला मोठा हार घालून मोठ्या जल्लोषात जरांगेंचे स्वागत करण्यात आले. मध्यरात्रीही पाटोद्यात जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांचा आवाज घुमत होता. दादा सलाईन घ्या, अशी विनंती उपस्थित समर्थक करत होते. मात्र यावेळी समाजाशी संवाद साधताना आरक्षण महत्त्वाचं आहे, दौरा महत्त्वाचा नाही असं विधान जरांगेंनी केलं.