Satara Accident News : साताऱ्यात भरधाव कार गर्दी घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक चिमुकली गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भरधाव कार गर्दीत घुसून भीषण अपघात
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई बस स्थानकासमोर महाबळेश्वर येथून वाई शहराकडे येणार्या रस्त्यावर भरधाव वाहनाने गाडी (एमएच ०४ जीई ६६९५) रस्त्याच्या कडेने चालणार्या पादचार्यांना जोरदार धडक मारली. गाडी त्याच वेगात पुढे जात राहिल्याने गाडीच्या धक्क्याने एका पादचार्याचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते (सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम आणि अविनाश केळगणे (वारोशी, ता महाबळेश्वर) सिताराम धायगुडे (वाई) आणि शिवांश जालिंदर शिंगटे (राऊतवाडी, ता कोरेगाव) हा साडेतीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमीना वाई आणि सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व पदचारी वाई बाजारपेठेतील आपापली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला.
नागरिक व आजूबाजूच्या व्यापार्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची, ता हातकणंगले जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती परिक्षाविधीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. या अपघाताचा उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करीत आहेत.