• Fri. Mar 13th, 2026

    Mumbai News: 2019पासून मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार सुरू, अखेर मे महिन्यात काम पूर्ण; SV Roadवर कोंडीमुक्त प्रवास

    Mumbai News: 2019पासून मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार सुरू, अखेर मे महिन्यात काम पूर्ण; SV Roadवर कोंडीमुक्त प्रवास

    Mrinal Tai Gore Flyover: गोरेगावमध्ये असलेल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा 2019पासून विस्तार सुरू होता. या 2.3 किमी पुलाचा 750 – 840 मीटर विस्तार कर एस.व्ही रोड लगत सुरू आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गोरेगाव पश्चिममधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित कामाला गती दिली जात आहे. येत्या पावसाळ्याआधीच पुलाचे काम पूर्ण करून तो वाहनचालकांसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महापालिका करत आहे. पावसाळ्याआधीच पूल खुला झाल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनचालकांचा एस. व्ही. रोडवरील वाहतूककोंडीमुक्त प्रवास होणार असून, वाहनचालकांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे.

    कसा आहे मार्ग?

    गोरेगाव येथील या उड्डाणपुलाचे राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोड लगत विस्तारी-करण केले जात आहे. वाढीव कामामुळे याचा खर्च २५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. या पुलामुळे एस. व्ही. रोडवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोपे झाले. या पुलाच्या बांधकामासाठी २५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामानंतर राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोडलगत पुलाच्या विस्तारित बांधकामाला प्रत्यक्षात मार्च २०१९ पासून सुरुवात झाली.Maharashtra TimesGMLR: ‘फिल्म सिटी’ ते खिंडीपाडा भुयारी बोगदे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून खोदकाम; लिंक रोडचा तिसरा टप्पा सुरू

    ७५० मीटर लांबीच्या या विस्तारित पुलाच्या बांधकामामध्ये जागेची अडचण आणि जलद बांधकाम करण्यासाठी या उड्डाणपुलाचे सुपर स्ट्रक्चर स्टीलने बांधण्यासाठी डिझाइन केले आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या एस. व्ही. रोड, राम मंदिर रोड आणि रिलीफ रोड या जंक्शनवरून जात आहे. तसेच वालभट नदी (राम मंदिर रोड) आणि ओशिवरा नदी (एस. व्ही. रोड) या दोन प्रमुख नद्यांवरून हा पूल जात आहे. येथून तासंतास होणाऱ्या प्रवासातून नागरिकांची सुटका होऊन हा प्रवास २० मिनिटांत होणार आहे.

    स्टील गर्डरचा वापर

    हा पूल वालभट नदी (राम मंदिर रोड) आणि ओशिवरा नदी (एस. व्ही. रोड) या दोन प्रमुख नद्यांवरून जात आहे. त्यामुळे या नद्यांच्या परिसरातील स्ट्रक्चरल स्टील बांधकामाला प्रचंड गंज चढू शकतो, तसेच या नदीवर भरती वा ओहोटीचा परिणाम होत असल्याने स्ट्रक्चरल स्टील बांधकाम गंजू शकते. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या सुपर स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टील गर्डर टाकण्यात आले आहे.

    Maharashtra TimesPune-Nagar Highway: देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर, पुणे-शिरूर 31 किमी लांब रस्ता; प्रवासात वेळ वाचणार

    ‘मृणालताई गोरे उड्डाणपूल येत्या पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पूल सुरू झाल्यास वाहनचालकांना दिलासा मिळेल,’ अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा