• Fri. Jan 24th, 2025

    भर रस्त्यात डंपर पलटी, बाजूने जाणाऱ्या दोन तरुणी चाकाखाली आल्या आणि अनर्थ घडला; चिंचवडमध्ये दुर्देवी घटना

    भर रस्त्यात डंपर पलटी, बाजूने जाणाऱ्या दोन तरुणी चाकाखाली आल्या आणि अनर्थ घडला; चिंचवडमध्ये दुर्देवी घटना

    Dumper Accident Chinchwad : चिंचवडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटलं आणि डंपर पलटी झाला. यात दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी : चिंचवड शहरातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे वेगात असलेला रेडमिक्स डंपर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

    भर रस्त्यात डंपरखाली आल्या तरुणी

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंजवडीकडून रेडिमिक्सने भरलेला डंपर एमएच १२/एक्सएल ५७४४ हा महाळुंगेच्या दिशेला चालला होता. वडजाई नगर कॉर्नर परिसरात आल्यानंतर डंपर वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो पलटी झाला. त्याचवेळी तिथून स्कूटरवर दोन तरुणी चालल्या होत्या. त्या दोघी त्यांच्या स्कूटरसह डंपरखाली चिरडल्या गेल्या. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
    पत्नीला संपवलं, नंतर मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये, हाडं मिक्सरमध्ये…; पतीचं हादरवणारं कृत्य

    तरुणींवर काळाचा घाला

    घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून, क्रेनच्या साहाय्याने रेडिमिक्स डंपर उचलून त्याखाली आलेल्या दोन तरुणींना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. सध्या त्या दोन तरुणींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या दोन्ही तरुणी आयटी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुचाकीवरून दोघी चालल्या असताना काळाने घाला घातला. दोघींच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच नागरिकांमधून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
    डंपरने अचानक वळण घेतलं आणि आक्रित घेतलं, परीक्षेवरुन येताना काळाचा घाला, तरुणाचा चिरडून मृत्यू

    भर रस्त्यात डंपर पलटी, बाजूने जाणाऱ्या दोन तरुणी चाकाखाली आल्या आणि अनर्थ घडला; चिंचवडमध्ये दुर्देवी घटना

    अपघाताच्या घटनांमध्ये सतत वाढ

    पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. राज्यभरात नववर्ष सुरू होऊन एक महिनादेखील झाला नसून आतापर्यंत शेकडोंच्या संख्येने अपघात होत यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातात अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शुक्रवारी झालेल्या अपघातात निरापाराध असलेल्या दोन तरुणींना आपले प्राण गमावावे लागले. या घटनेने घाटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed