• Fri. Jan 24th, 2025
    सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; लवकर रस्तेप्रवास महागणार, एसटीच्या तिकीटदरात १४.९५ टक्के वाढ

    ST Bus Fare Hike: परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीटवाढीला मंजुरी देण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    st bus 2

    मुंबई : मुंबईसह राज्यातील रस्तेप्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरवाढीस गुरुवारी मंजुरी मिळाली. यानुसार एसटीच्या तिकीटदरात १४.९५ टक्के वाढ होणार आहे. त्याचसोबत मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरातील तीन रुपयांची प्रस्तावित वाढ लवकरच लागू होईल.

    परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीटवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सुधारित तिकीटदर केव्हा लागू होतील, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
    अमित शहा, एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर; जिल्ह्यातील शेतकरी घालणार मंत्री शहांना साकडे
    राज्यात सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना १०० दिवसांचे नियोजन करून त्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने केलेल्या नियोजनात स्वमालकीच्या पाच हजार नव्या बस विकत घेणे, पहिल्या चार महिन्यांत २० चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करणे, १२५ बसचे पारंपरिक इंधनावरून सीएनजी इंधनात रूपांतर आणि एसटी तिकीटदरात १४.९५ टक्के भाडेवाढ अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता.

    विधानसभा निवडणुकांपूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात एसटीच्या तिकीटदरात सरसकट १८ टक्के वाढ प्रस्तावित होती. मात्र त्यात सुधारणा करत १४.९५ टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवडणुकांच्या काळात हा प्रस्ताव थांबवण्यात आला होता. मात्र आता एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने यास मंजुरी दिली. सन २०२१पासून दरवाढ प्रलंबित आहे, असा युक्तिवादही महामंडळाने केला.
    दारुच्या नशेत ‘ट्रूथ अँड डेअर’, पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार, बाथरुममध्येच…
    ‘सेवा सुधारा, मग भाडे वाढवा’
    ‘शहर, तसेच उपनगरात रिक्षा-टॅक्सीचालकांकडून कमी अंतराचे भाडे नाकारण्याच्या घटना वारंवार घडत आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अरेरावीमुळे रेल्वे आणि मेट्रो स्थानक परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होते. यामुळे आधी रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रवासी सेवा सुधारण्याची गरज असून त्यानंतर राज्य सरकारने भाडेवाढ देणे योग्य ठरेल,’ अशी प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली.
    ‘स्टीअरिंग’ माझ्याच हाती! राज ठाकरेंचा नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना संदेश, पहिल्याच दिवशी गुफ्तगू
    रिक्षाचे भाडेदर २६ रु., टॅक्सीचे ३१रु.
    एसटीपाठोपाठ रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात तीन रुपयांची वाढ प्रस्तावित.
    ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३वरून २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे २८वरून ३१ रुपये करण्याचा प्रस्ताव.
    मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या मंजुरीनंतर भाडेवाढ लागू होणार.
    भाडेवाढ निश्चित, मात्र ती सरसकट तीन रुपये करायची की, दोन रुपये हे अद्याप ठरलेले नाही.
    सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षा-टॅक्सी मीटरच्या प्रमाणीकरणाची तारीख निश्चित करणे आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर भाडेवाढ लागू होण्याची तारीख घोषित होणार

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed