लातूर मध्ये ढाळेगाव येथील पोल्ट्री फार्ममधील ४२०० कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रशासनाने नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. प्रशासनाने अलर्ट घोषित केला आहे. पोल्ट्री फार्म धारक सचिन गुळवे यांच्या मते, थंडीत लाईट नसल्यामुळे कोंबड्या मरण्याचा शक्यता आहे. अहवाल आल्यानंतरच बर्ड फ्लू की थंडी, कारण स्पष्ट होईल.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्री फार्म मधील 4200 कोंबड्याची पिल्ले मृता अवस्थेत आढळून आल्याने लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लू आला का अशी भीती कुक्कुटपालक व्यवसायिकांमध्ये दिसून येते आहे. याआधी उदगीर शहरात अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्या कावळ्यांना बर्ड फ्लू ची लागण असल्याचे भोपाळ प्रयोगशाळेने अहवाल दिला होता.
पशुवैद्यकीय प्रशासन अलर्ट मोडवर
काही दिवसांपूर्वी उदगीर येथे शेकडो कावळे हे बर्ड फ्लूमुळे मृत पावले होते यामुळे उदगीर शहरापासून दहा किलोमीटर परिघ हा रेड अलर्ट एरिया म्हणून प्रशासनाने जाहीर केला होता. यानंतर आज अहमदपूर तालुक्यातील ढाळेवाडी या गावातील भागीरथी पोल्ट्री फार्म येथील 4200 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. कोंबड्याच्या रक्ताची नमुने अहवाल पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाज थंडीमुळे या कोंबड्यांचा मृत्यू झाला असावा असा व्यक्त करण्यात येतो आहे.
काय आहे पोल्ट्री फार्म धारकाचे म्हणणे
ढाळेगाव येथे बर्ड फ्लूमुळे 4200 कोंबड्या मेल्या आहेत. अद्याप तसा अहवाल पुणे प्रयोगशाळे कडून प्राप्त झाला नाही. पोल्ट्री फॉर्म मधील लाईट काही तासांसाठी गेल्यामुळे थंडी जास्त झाली यामुळे या कोंबड्या मेल्या असाव्यात असे मत पोल्ट्री फार्म धारक सचिन गुळवे यांनी व्यक्त केले आहे. जेव्हा अहवाल प्राप्त होईल तेव्हाच ते बर्ड फ्लू मेले की थंडीने मेले हे स्पष्ट होईल. प्रशासनाकडून प्राथमिक अंदाज हा कोंबड्या गुदमरून मेल्या आहेत असा दिला गेला आहे यामुळे अहवाल येईपर्यंत वाट पहावी लागेल.