Ratnagiri News : कोकणात विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा पक्षप्रवेशांचा धुमधडाका रत्नागिरीतून सुरू होणार आहे. त्यामुळे आज प्रवेश कोण करतील? ते या पक्षप्रवेश कार्यक्रमावरूनच तुम्हाला, आगामी प्रवेश काय असू शकतात याची कल्पना येईल. असं सांगत सामंत यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला
आजपासून या पक्षप्रवेशाचा मुहूर्त रत्नागिरीत होत आहे. लांजा राजापूर मतदारसंघातून याची सुरुवात आठ दिवसांपूर्वी झाली आहे असे सांगत, राजन साळवी यांच्या बद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले की, साळवी हे काही जिल्ह्यात एकच माजी आमदार नाहीत. त्यांच्याही अगोदर पासून काम करणारे कडवट शिवसैनिक आहेत. तेही पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे साळवी यांच्या पक्षप्रवेशाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे.
टायगर ऑपरेशन सुरू झालं आहे
सामंत पुढे म्हणाले की,जे आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवतात, आम्हाला पक्षाबद्दल सांगतात त्यांच्यासोबतच काम करणाऱ्यांनाही खऱ्या अर्थाने कळले आहे की, खऱ्या अर्थाने जर शिवसेना कोणती असेल, बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणती असेल तर ती शिवसेना म्हणजे, एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे गटाचे दहा माजी आमदार, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार, जिल्ह्यातील ठाकरे गटाचे अनेक जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक यांचा पक्षप्रवेश होणार आहे. टायगर ऑपरेशन हे सुरू झालं आहे.
रत्नागिरीतून सुरूवात
कोकणात विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा पक्षप्रवेशांचा धुमधडाका रत्नागिरीतून सुरू होणार आहे. त्यामुळे आज प्रवेश कोण करतील? ते या पक्षप्रवेश कार्यक्रमावरूनच तुम्हाला, आगामी प्रवेश काय असू शकतात याची कल्पना येईल. असं सांगत सामंत यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र एक नंबर वर
दावोसमधून महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणुकीची मुहूर्तमेढ यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोवली होती. आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दौऱ्यात आम्ही हजारो कोटींचे खरे एमओयू करण्यात आम्ही सांघिकरित्या गेल्या तीन वर्षात यशस्वी झालो आहोत. एफडीआय मध्ये गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र एक नंबर वर आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवर टीका
एकनाथ शिंदे चांगले स्वभावाचे आहेत ते कधीही कोणावर टीका करत नाहीत. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत, एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवर टीका करत काही लोकांनी रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. शिंदे साहेबांवर अत्यंत खालच्या थराची टीका केली. तशीच टीका यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबावरही केली होती.