वाल्मिक कराडचे नाशिक कनेक्शन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. यावरून देसाई मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांच्यावरही टीका करत आहेत. अण्णासाहेब मोरेंनी काही महिलांचे शोषण केले असाही आरोप देसाईंनी केला होता. याबाबत पुन्हा तृप्ती देसाईंनी धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच परळीत अनेक घोटाळे सुरू असल्याचा दावाही देसाईंनी केलाय. तर येत्या काळात करुणा मुंडेंसह परळीत जाणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या.