मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दिलीप वळसे पाटील व प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी यावर भाष्य केले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनी मांडली भूमिका
आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील हे दिसले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट मत मांडल्याचे बघायला मिळतंय. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, एक नक्की आहे की, आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्यांचे व्यक्तीगत काहीतरी असेल आणि त्यांनी असे सांगायचे की, राजीनामाच द्यावा लागेल. मग असे तर उद्या कोणीही कोणावरही काहीही आरोप लावेल.
सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न
फक्त तथ्य समोर येऊ द्या. आम्हाला कोणालाही वाचवायचे नाही. नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. कोणाच्याही व्यक्तीगत द्वेष भावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही राजीनामा मागणे योग्य नाही. खरंतर सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दिलीप वळसे पाटील याबद्दल बोलताना म्हणाले की, पूर्वीची परंपरा अशी आहे की, एखाद्या केसमध्ये जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर
नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेचच…
त्याच्यामध्ये राजीनामा दिला जातो. नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेचच दोषी होतो असे नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत आरोप होत आहेत. ते सिद्ध झाले तर तो नंतरचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील दोघांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल अगदी स्पष्ट भूमिका मांडल्याचे यावरून दिसत आहे. मनोज जरांगे यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.