संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे व वाल्मिक कराडवर हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचा आरोप संदीप क्षीरसागरांनी केलाय. कराडला अटक झाल्यानंतर सुद्धा कटकारस्थान सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कराडचं नाव येताच तपास थांबतो हे महाराष्ट्र पाहतोय, असे क्षीरसागर म्हणाले. वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केलीय.