Nashik Onion: भारतामधून निर्यात होणाऱ्या कांद्यापैकी सर्वाधिक कांदा बांगलादेशात निर्यात केला जातो. बांगलादेशचा आयातशुल्काचा निर्णय व केंद्राचा निर्यातशुल्कावरून आडमुठेपणा यामुळे कांद्याच्या निर्यातीत घसरण होण्याची भीती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.
भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशमध्ये होते. गेल्या वर्षी २० टक्के, तर त्याआधीच्या वर्षी १७ टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता. परंतु, आता बांगलादेशमध्ये जानेवारी अखेरीस स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे. बांगलादेश सरकारने याबाबत परिपत्रक काढले असून, त्यामध्ये आज (दि. १७) पासून कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात होणाऱ्या कांदा निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे.
‘लाडकी बहीण योजना’ नेमकी कशासाठी? योजनेला विरोध करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारचं न्यायालयात उत्तर
कांदा दरातील दररोजच्या घसरणीमुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून व सर्व राज्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क पूर्णपणे रद्द करावे, अशी सातत्यपूर्ण मागणी होत आहे.
मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…
दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात अनेक खासदारांनी, तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी सदनात केली होती. दोनच दिवसांपूर्वी आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समितीत लासलगाव येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ शून्य करावे. या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले होते.
Chhagan Bhujbal: भुजबळांनी राखले राष्ट्रवादीपासून अंतर; पक्षाच्या, तसेच पंतप्रधानांच्या बैठकीलाही गैरहजेरी
सरकार मात्र कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल संतापाची भावना निर्माण झाली आहे. बांगलादेश सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारनेही स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ शून्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
Hemlata Patil: महापालिका निवडणुकांपूर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का; डॉ. हेमलता पाटील दोन दिवसांत पक्ष सोडणार
निर्यातशुल्क कधी घटणार?
बांगलादेश सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारनेही स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ शून्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
गुरुवारी सरासरी दोन हजार रुपये दर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गुरुवारी (दि. १६) लाल कांद्यांची २२३०० क्विंटल आवक झाली. त्याला कमीत कमी १४००, जास्तीत जास्त २३८६, तर सरासरी २००० रुपये दर मिळाला. लासलगाव बाजार समितीत २४१९६ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमीत कमी ८००, जास्तीत जास्त २४५३, तर सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला.