• Sat. Jan 18th, 2025

    मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…

    मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…

    Lamborghini In Mantralaya: दलालांना मंत्रालयात प्रवेश मिळू नये, सामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशासाठी विशेष पास यंत्रणा उभारण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांतच मंत्रालयाच्या आवारात आलेली आलिशान कार चर्चेचा विषय ठरली

    महाराष्ट्र टाइम्स
    lamborghini car

    नाशिक : महागड्या लॅम्बर्गिनी कारमधून एक व्यक्ती मला भेटण्यासाठी मंत्रालयात आली होती, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. मात्र, त्या कारच्या काळ्या काचा खाली करून पाहिले असते, तर कदाचित कारमध्ये रोहित पवारच दिसले असते, असा टोला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी नाशिकमध्ये लगावला. आरोप करण्यापूर्वी खात्री तर करायची, असेही ते म्हणाले.

    दलालांना मंत्रालयात प्रवेश मिळू नये, सामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशासाठी विशेष पास यंत्रणा उभारण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांतच मंत्रालयाच्या आवारात आलेली आलिशान कार चर्चेचा विषय ठरली. या कारमधील व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचा दावा आमदार पवार यांनी केला होता. सामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशासाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते. परंतु, आलिशान लॅम्बर्गिनीला प्रवेशद्वारावर ना कुणी अडवले, ना तपासणी केली.
    ‘लाडकी बहीण योजना’ नेमकी कशासाठी? योजनेला विरोध करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारचं न्यायालयात उत्तर
    ‘व्यक्ती महागडा असला, की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही गाडी,’ असा टोला आमदार पवार यांनी लगावला होता. पवार यांच्या आरोपावर नाशिक दौऱ्यावर असलेल्या विखे-पाटील यांनी गुरुवारी भाष्य केले. त्या गाडीला काळ्या काचा होत्या असे आमदार पवार म्हणत आहेत. आजपर्यंत माझ्यावर कुणीही असे आरोप केलेले नाहीत. रोहित पवार माहिती घेऊन बोलले असते, तर बरे झाले असते. मंत्रालयात अनेक गाड्या येतात. त्यामुळे अमुक गाडी माझ्याकडेच आली, हे कसे सांगता येईल, असा सवालही विखे-पाटील यांनी केला.
    Hemlata Patil: महापालिका निवडणुकांपूर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का; डॉ. हेमलता पाटील दोन दिवसांत पक्ष सोडणार
    पाणीवापराचे शंभर टक्के मीटरींग
    नाशिक : नाशिक महापालिकेने सन २०२५-२६ या वर्षाकरिता ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविली आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येनुसार महापालिका क्षेत्रासाठी बिगर सिंचन पाण्याची मागणी तुलनेत वाढत असल्याने दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल, यासाठी जलसंपदा तसेच महापालिकेने समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्या. शहरातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शंभर टक्के पाण्याचे मीटरिंग करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिले.
    Chhagan Bhujbal: भुजबळांनी राखले राष्ट्रवादीपासून अंतर; पक्षाच्या, तसेच पंतप्रधानांच्या बैठकीलाही गैरहजेरी
    सन २०२४-२५ या वर्षासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदवली होती. वाढत्या लोकसंख्येमुळे दरवर्षी महापालिकेडून शंभर दशलक्ष घनफूट पाण्याची अधिक मागणी केली जात आहे. त्यात आता सिंहस्थासाठी दरवर्षी पाणी आरक्षण वाढणार आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचे नियोजन करण्याकरिता सिंहस्थ निधीतून तरतूद करण्याचे निर्देशही विखे यांनी यंत्रणांना दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed