• Sat. Jan 18th, 2025

    सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास

    सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास

    Saif Ali khan Attack Case : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासावेळी दिसले. कोण आहेत दया नायक?

    सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास

    मुंबई : बॉलिवूड नवाब सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर बुधवारी रात्री चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. त्याला मध्यरात्री तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वांद्रे येथील त्याच्या इमारतीतील १२ मजल्यावर राहत्या घरी आरोपीने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर खोल जखमा झाल्या. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

    सैफ अली खानच्या टीमने दिली माहिती

    अभिनेता सैफ अली खानच्या जनसंपर्क प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आणि करिनाच्या घरी बुधवारी रात्री अडीच वाजता चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यात सैफवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आम्ही मीडिया आणि त्याच्या चाहत्यांना संयम बाळगण्याची विनंती करत आहोत. सध्या याप्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.
    सैफ अली खान प्रकरणात आता पाकिस्तानची उडी, हल्ल्याचा भारतीय संघटनेशी जोडला संबंध

    एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्याकडून तपास

    या घटनेनंतर, सैफ अली खानच्या घरी तपासासाठी मुंबई पोलीस पोहोचलेले दिसले. मुंबई पोलिसांटच्या टीममधील एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण टीमसोबत दिसले. मात्र त्यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देण्यात नकार दिला. मात्र दया नायक या प्रकरणात तपास करत असल्याने योग्य ती कारवाई, तसंच आरोपीला ताब्यात घेतलं जाईल असं बोललं जात आहे. आरोपीवर ३११, ३१२, ३३१(६), ३३१(७), ३३१(४) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास

    कोण आहेत दया नायक?

    दया नायक हे मुंबईचे पोलीस अधिकारी आहेत. ते ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाताता. ते १९९५ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पोलीस दलात दाखल झाले आणि १९९६ मध्ये जुहू पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. दया नायक यांनी ८० हून अधिक गुन्हेगारांना चकमकीत ठार केलं असल्याची माहिती आहे. ते सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही ते मुंबई पोलिस अधिकाऱ्यांसोबत दिसले होते.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed