Kasarvadvali-Gaimukh Metro Project: ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील कासारवडवली ते गायमुख या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात जवळपास २० टक्के वाढ झाली आहे. मूळ ४४० कोटींचा असलेला हा प्रकल्प ५०० कोटींच्या वर गेला आहे.
हायलाइट्स:
- ३१ मार्च २०२४ होती काम पूर्ण करण्याची मुदत
- विलंबाबद्दल कंत्राटदाराला २२ लाखांचा दंड
- आता एप्रिल २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश
दिंडोरी संशयाच्या फेऱ्यात! फरार असताना वाल्मीक कराडचा मुक्काम, फूटेज जप्त, गुरुपीठाने फेटाळले आरोप
मेट्रो मार्ग-९ व ‘७अ’ला मुदतवाढ दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर या मेट्रो-९ व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ‘मेट्रो-७अ’लादेखील मुदतवाढ देण्यात आल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ला जारी करण्यात आले होते. मेट्रो-९ मार्गिकेचे बांधकाम ९ सप्टेंबर २०२२ व ‘मेट्रो ७अ’चे बांधकाम ८ मार्च २०२३ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. आता मात्र मेट्रो-९साठी जून २०२५, तर ‘मेट्रो७-अ’ साठी जुलै २०२६ अशी नवी कालमर्यादा निश्चित झाल्याचे माहितीत समोर आले आहे.
Delhi Election 2025: महिलांना दरमहा २५०० रुपये, होळी-दिवाळीत मोफत सिलेंडर, दिल्लीत भाजपकडून ‘रेवड्यां’ची बरसात
गर्दीच्या वेळेत १० मिनिटांनी फेरी
नवी मुंबई : सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो-१वर २० जानेवारीपासून फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. त्यानुसार, गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी ७.३० ते १० आणि सायंकाळी ५.३० ते ८, तसेच पेंधर येथून सकाळी ७ ते ९.३० आणि सायंकाळी ५ ते ७.३०दरम्यान दर १० मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. उर्वरित वेळेत बेलापूर व पंधर येथून दर १५ मिनिटांनी मेट्रो धावेल. बेलापूर आणि पेंधर स्थानकातून सकाळी ६पासून मेट्रोसेवा सुरू होईल. बेलापूर येथून रात्री १० वाजता व पंधर येथून रात्री ९.४५ वाजता मेट्रोची शेवटची फेरी असणार आहे.