Ratnagiri News : रत्नागिरी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा संतापजनक प्रकार विद्यार्थिनीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. यानंतर पालकांनी शिक्षकाला घेरले आणि त्याला जाब विचारला. तर त्याला चांगला चोप देखील दिला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षकाचे निलंबन केले. नामांकित असलेल्या या संस्थेच्या शाळेत असा प्रकार आजवर कधीही घडला नव्हता त्यामुळे संस्थाचालकांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
बहिणीचा विनयभंग, भाऊ गेला आरोपीच्या घरी आणि पुढे जे घडले ते अतिशय….
कंत्राटी तत्वावर असलेल्या संशयित शिक्षकाने शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे समजताच पालक चांगलेच संतापले आहेत. शाळेचा एक शिपायाने संतप्त होत पालकांनाच मारहाण केल्याचे देखील वृत्त आहे. संबंधित प्रकारामुळे शाळेच्या आवारात मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळत आज काही वेळातच रत्नागिरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रत्नागिरी पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली असून पुढील तपास सुरु आहे. तर पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी संबंधित कंत्राटी शिक्षकाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.