• Wed. Jan 15th, 2025

    वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 14, 2025
    वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद




    मुंबई, दि. १४ :- वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधील जलसंपदा विभागाकडील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या. पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळ, कार्यालयात झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या.

    या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता  ह. वि. गुणाले व ह. तु. धुमाळ, उपविभागीय अधिकारी श्री. कचरे  यांच्यासह  जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवठे-केंजळ उपसा सिंचन योजना, जांभळी बंधाऱ्याची उंची वाढविणे, जललक्ष्मी योजना-आकोशी पाणी पुरवठा योजना, देवघर उपसा सिंचन योजना, बळकवडी-देवघर योजनेतून खंडाळा तालुक्यातील वंचित १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देणे आणि नागेवाडी धरणामध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

    ००००

    एकनाथ पोवार/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed