Santosh Deshmukh Daughter Walmik Karad Macoca : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणि खंडणीप्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या लेकीने तसंच त्यांच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर संतोष देशमुखांची लेक कडाडली, आाता त्या सर्वांना…
काय म्हणाली संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख?
माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली, तसंच हत्येसाठी कोणी मदत केली त्या सर्वांना या हत्येप्रकरणात सहआरोपी करावं. तसंच ज्यांनी कोणी हत्या केली त्या सर्वांवर ३०२ अंतर्गत मकोका लागला पाहिजेच, अशी आमची मागणी होती. कराडवर मकोका लावल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! अखेर वाल्मिक कराडवर मकोका, न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
धनंजय देशमुख काय म्हणाले?
आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. तसंच या हत्येप्रकरणात ज्या यंत्रणा कार्यरत आहेत, त्यांच्यावरही विश्वास आहे. या हत्येप्रकरणात जे आरोपी असतील, त्या सर्वांनाच मकोका आणि ३०२ अंतर्गत घेण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही वेगळं काहीच मागितलं नाही. आम्ही केवळ न्याय मागतो आहे. हत्येमध्ये कोणाचीही नावं आली, तरी त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे.
Walmik karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यावर सुरेश धसांची थोडक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी आता संपल्यानंतर त्याला मंगळवारी केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मात्र आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनाण्यात आली आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर संतोष देशमुखांची लेक कडाडली, आाता त्या सर्वांना…
वाल्मिकच्या संपत्तीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती. खंडणीप्रकरणात वाल्मिकची संपत्ती सध्या रडारवर आहे. कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून शहरात टायर जाळण्यात आले, तर रास्तारोको करण्यात आला. वाल्मिक कराडआधी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी प्रतिक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर याआधीच मकोका लावण्यात आला आहे.