• Mon. Mar 16th, 2026

    Thane Crime: गुन्ह्यांसाठी सिमकार्ड पुरवणारा अटकेत; ग्राहकांना फसवलं, सगळं बिंट फुटलं

    Thane Crime: गुन्ह्यांसाठी सिमकार्ड पुरवणारा अटकेत; ग्राहकांना फसवलं, सगळं बिंट फुटलं

    Thane News: फसवणूक झालेले ९० टक्के ग्राहक हे उत्तर प्रदेश व बिहारमधील असून सिमकार्ड खरेदीच्या वेळी सदर ग्राहकांच्या आधारकार्डचा वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

    गुन्ह्यांसाठी सिमकार्ड पुरवणारा अटकेत(फोटो– Getty Images)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे: नवीन सिमकार्ड खरेदी करताना विक्रेता तुमच्या नावाचे एकच कार्ड ॲक्टिव्हेट करतोय ना, याची खात्री करा. सायबर गुन्ह्यांसाठी शंभरहून अधिक कार्ड पुरविणाऱ्यास सायबर पोलिसांनी नागपाडा येथून पकडले. मोहम्मद सुलतान अन्सारी असे आरोपीचे नाव असून तो खासगी कंपनीची सिमकार्ड विकताना एकाच्या नावावर दोन सिमकार्ड सुरू करायचा. एक ग्राहकाला, तर दुसरे कार्ड सायबर गुन्ह्यासाठी विक्री करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

    सायबर गुन्ह्यासाठी बँक खात्यांबरोबरच संपर्कासाठी मोबाइल क्रमांकाची गरज लागते. मोबाइल कंपन्यांसाठी काम करणारे एजंट ग्राहकांच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावाने सिमकार्ड ॲक्टिव्हेट करतात. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टल यांच्या पडताळणीमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या शंभरपेक्षा अधिक मोबाइल क्रमांकाची यादी देण्यात आली. हे क्रमांक नागपाडा येथील एका एजंटने ॲक्टिव्हेट केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मध्य विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या वतीने तपास सुरू करण्यात आला. नागपाडा येथील एजंट मोहम्मद सुलतान अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले.

    पोलिसांनी आरोपी मोहम्मद सुलतान अन्सारी याची कसून चौकशी केली असता त्याने ही कबुली दिली. यातील ९० टक्के ग्राहक हे उत्तर प्रदेश आणि बिहार येथील असून सिमकार्ड खरेदीच्या वेळी त्यांच्या आधारकार्डचा वापर करण्यात आला. त्यांचा मुंबईतील तात्पुरता खोटा पत्ता टाकून एकाच वेळी दोन कार्ड ॲक्टिव्हेट केली. एक ग्राहकाला देण्यात आले आणि दुसरे कार्ड सायबर गुन्ह्यांसाठी झिशान नावाच्या तरुणाला दिल्याचे त्याने सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा