Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच शहरातून पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
नागेशचं एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं. या संबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर ते संतापले होते. त्यानंतर मुलीच्या मोबाईलवरून तिच्या घरच्यांनी नागेशला मेसेज करून एका ठिकाणी बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. मेसेजवर विश्वास ठेवून नागेश ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. मात्र तेथे पोहोचताच मुलीच्या घरच्यांनी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी त्याला घेरून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत नागेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Mumbai Crime : जादूटोण्याच्या संशयावरुन नवऱ्याने बायकोला संपवलं, Video कॉल करुन मुलाला दाखवली आईची बॉडी; मुंबईतील घटना
10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर नागेशच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मुलीचे वडील आणि इतर नातेवाईकांसह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानलं जात आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Raigad Crime : फेसबुकवर ओळख, कर्जतमध्ये सापळा; ‘बंटी-बबली’ जोडीचा भयानक कारनामा, वृद्धाचं अपहरण करून लाखोंची उकळपट्टी
या प्रकरणी पोलिसांनी मुलीची आई, वडील, तसेच चुलत्या, आणि इतर नातेवाईक यांच्यासह 10 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी संगनमत करून नागेशची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. एका तरुणाची अशा प्रकारे नियोजनबद्ध रितीने हत्या केल्यामुळे कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरात तणावाचं वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना अटक करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
