डोंबिवलीतील अरमान शेखने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे शोषण केले. भिवंडीत लग्नाचा घाट घातला असतानाच हिंदू कार्यकर्त्यांच्या एन्ट्रीने डाव फसला. विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी आरोपी अरमान शेख याने सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून मैत्री केली होती. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अरमानने या मुलीला ती १८ वर्षांची झाल्यावर लग्न करू, असे वचन दिले होते. त्यानुसार मुलीचे वय १८ होताच त्याने लग्नाची तयारी केली.लग्नासाठी अरमानने पीडितेला भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावले होते. तिथे मुस्लिम पद्धतीने निकाह करण्यासाठी काजी आणि साक्षीदारही उपस्थित होते. सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच, एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली. त्यांनी तातडीने लग्नाच्या ठिकाणी धडक दिली. एका हिंदू मुलीशी मुस्लिम पद्धतीने लग्न केले जात असल्यावरून तिथे मोठा गदारोळ झाला.
Pune Crime : पाणी मागून तरुणीच्या हाताला धरलं, म्हणाला ‘तू खूप सुंदर दिसतेस’; पुण्यात डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडली, गुन्हा दाखल
पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
भिवंडीतील लग्नाच्या ठिकाणी झालेला वाद विकोपाला गेल्याने हे प्रकरण शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पीडित तरुणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असल्याने शांतीनगर पोलिसांनी हे प्रकरण विष्णूनगर पोलिसांकडे वर्ग केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे केवळ प्रेमाचे प्रकरण वाटत होते, मात्र तपासातून वेगळीच माहिती समोर आली.
ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराचा गुन्हा
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अरमानने आधी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या काही खासगी गोष्टींचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने तिला जबरदस्तीने लग्नासाठी भिवंडीत बोलावले होते. या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख विरोधात पोक्सो (POCSO) आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Supriya Sule: अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा; पण निधी कुठे? नीरा-कऱ्हा प्रकल्पावर सुप्रिया सुळे यांचा सवाल
ऑनलाइन सेवा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या मैत्रीतून अशा घटना घडत असल्याने पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
